यवतमाळमध्ये रानटी जनावरांचा धुमाकूळ !

झरी तालुक्यात रानटी जनावरांचा शेतांमध्ये वावर वाढला आहे. रानटी जनावरे शेतात येऊन छोट्या अन् नुकत्याच उगवलेल्या पिकांची नासधूस करत आहेत.
रानटी जनावरांचा धुमाकूळ
रानटी जनावरांचा धुमाकूळ प्रसाद नायगावकर

प्रसाद नायगावकर

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा हा वनसंपदेने संपन्न असा जिल्हा आहे. जंगलक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने जिल्ह्यात अनेक जंगली प्राणी आढळतात. मात्र याच जंगली प्राण्यांमुळे सध्या यवतमाळमधील शेतकरी त्रस्त झाले आहेत. Wild animals plague farmers in Yavatmal

झरी तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. अनेक शेतकऱयांनी आपल्या शेतामध्ये बियाणांची पेरणी देखील केली आहे. नुकतीच पेरणी केली असल्याने शेतात पीक वाढीस अद्याप अवधी आहे.

हे देखील पहा -

अशातच झरी तालुक्यात रानटी जनावरांचा शेतांमध्ये वावर वाढला आहे. रानटी जनावरे शेतात येऊन छोट्या अन् नुकत्याच उगवलेल्या पिकांची नासधूस करत आहेत. झुंडीने येणारी हि जनावरे शेतकऱयांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहेत.

झरी तालुक्यातील शेतकऱयांना रानटी जनावरांचा नाहक त्रास होऊन त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या आधीचा शेती हंगाम हा अवकाळी पावसाने गेला. या हंगामात तरी भरघोस उत्पन्न मिळेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना आता रानटी जनावरांकडून होणाऱ्या उपद्रवास सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

रानटी जनावरांचा धुमाकूळ
धक्कादायक ! दगडाची मुर्ती तोडली म्हणून गावपंचायतीने ठोठावला 21 हजाराचा दंड

या रानटी जनावरांकडे वनविभाग प्रशासनाने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com