ATM बंद होणार? वाचा काय आहे नवीन नियम

साम टीव्ही
मंगळवार, 2 मार्च 2021
  • ATM आता बँक शाखांमध्येच
  • खर्चकपातीसाठी बँकांचा निर्णय
  • ऑनलाईन व्यवहार ATM च्या मुळावर

बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी ATM बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतलाय. त्याची अंमलबजावणीही सुरू झालीय. त्यामुळे ग्राहकांची अडचण होऊ शकते. 

शॉपिंग कॉम्प्लेक्स, रहिवासी इमारती आणि अन्य ठिकाणी असलेली 'ATM' टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतलाय. त्यामुळे अन्यत्र असलेली मोजकी 'एटीएम' वगळता बँकेच्या फक्त शाखांमध्येच एटीएम सेवा दिली जाणारेय. कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बँकांनी खर्चात कपात करायला सुरुवात केलीय. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुण्यासारख्या दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 

खर्चकपात ATM च्या मुळावर?
ऑफसाइट ATM साठी बँकांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. यामध्ये जागेचं भाडं, सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था, तसंच वातानूकूलन यंत्रणा, वीजबिल आणि पर्यायी विद्युत पुरवठ्यासाठी बराच खर्च होतो. या तुलनेत 'एटीएम'वरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या कमी होऊ लागलीय. कोरोनाकाळात नोटांचा वापर कमी होऊन सर्वत्र डिजिटल पेमेंट वाढू लागलेत.  

बँक ग्राहक शक्यतो आपल्याच बँकेच्या ATM मध्ये कार्डांचा वापर करतात. सध्या महिन्याला सरासरी तीन ते पाच व्यवहार मोफत असल्याने 95 टक्क्यांहून अधिक ग्राहक या मर्यादेतच व्यवहार करतात. त्यामुळे आंतरबँक व्यवहार शुल्काद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरही मर्यादा आल्यात. म्हणूनच खर्च वाचवण्यासाठी बँकेच्या स्वमालकीच्या जागांचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live