राहुल बजाजनं केंद्र सरकारला सुनावलं

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 डिसेंबर 2019

राहुल बजाज यांनी उपस्थित केलेल्या शंकेला गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले. ‘‘तुम्ही शंका उपस्थित केल्यानंतर लोकांच्या मनात भीती आहे, यावर कोणीही विश्‍वास ठेवणार नाही. सरकार अत्यंत पारदर्शकपणे काम करत आहे आणि कोणत्याही प्रकारच्या विरोधाला आम्ही घाबरत नाही,’’ असे अमित शहा म्हणाले.

मुंबई - ‘तुम्ही चांगले काम करत आहात; पण तरीही, समजा आम्ही तुमच्यावर जाहीरपणे टीका केली, तर तुम्हाला ती सहन होईल की नाही, याबाबत आम्हाला खात्री नाही,’ असे उद्योगपती राहुल बजाज यांनी आज केंद्र सरकारला सुनावत भारतीय उद्योगाची भावना व्यक्त केली. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल बजाज यांनी त्यांची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेदेखील उपस्थित होते. राहुल बजाज म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रातील कोणीही याबाबत खुलेपणाने बोलणार नाही; पण मी बोलतो आहे. तुम्ही चांगले काम करत आहात. मात्र, तरीही काही वेळेस तुमच्यावर टीका केली तर ती कितपत सहन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका आहेत.’’

उद्योगपती आणि बॅंक व्यावसायिकांच्या मनात सरकारबद्दल भीती आणि अविश्‍वास असून, मोदी सरकारमुळे भारताच्या सहिष्णुतेच्या वातावरणाला हानी पोचत आहे, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

Web Title: Will the central government suffer criticism rahul bajaj


संबंधित बातम्या

Saam TV Live