कोरोनाच्या संकटात चीन-अमेरिकेचं युद्ध भडकणार?

साम टीव्ही
शुक्रवार, 15 मे 2020
  • कोरोनाच्या संकटात चीन-अमेरिकेचं युद्ध भडकणार?
  • चीन आणि अमेरिकेत वादाचा आगडोंब
  • चीन विरुद्ध अमेरिका असं महायुद्ध पेटण्याची चिन्ह

कोरोनाचं संकट आल्यापासून चीन वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, अमेरिकेनंही चीनवर नेहमी टीकास्त्र डागलंय. त्यामुळे या वादाचा परिणाम महायुद्धात होईल की काय? अशी भीती व्यक्त होतेय.
संपूर्ण जग कोरोनाशी झगडत असताना तिकडे चीन आणि अमेरिकेतून विस्तवही जात नाहीय. चीनच्या हद्दीतून अमेरिकेच्या युद्धनौका हाकलून लावल्याचा दावा चीननं केलाय. अमेरिकेकडून वारवंरार चीनवर आरोप केले जातायत. कोरोनामुळे आधीच चीन संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय, त्यातच अमेरिकेनं घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे चीन-अमेरिकेत महायुद्ध भडकण्याची चिन्ह आहेत. पण या देशांच्या युद्धाचे जे परिणाम होतील ते जगावर परिणाम करणारे असतील हे नक्की. 

चीन आणि अमेरिकेत कोण आहे वरचढ?
चीनकडे 21 लाख 83 हजार सैनिक आहेत, तर अमेरिकेकडे 14 लाख सैनिक आहेत. त्याचसोबत चीनकडे 1232 कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहेत तर अमेरिकेकडे 2085 कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहेत. चीनकडे युद्धासाठीची 281 हेलिकॉप्टर असून अमेरिककडे 967 हेलिकॉप्टर आहेत. चीनकडे 3500 टँक तर अमेरिकडे 6289 टँक आहेत. चीनकडे फक्त 371 युद्धनौका आहेत तर अमेरिकेकडे 715 युद्धनौका आहेत.

चीन आणि अमेरिकेत भडकलेला वाद हा कोरोनाच्या संकटावर अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हे दोन्ही देश शक्तिशाली देश म्हणून ओळखले जातात. मात्र संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना हे महायुद्ध भडकलं तर त्याची किंमत संपूर्ण जगालाच भोगावी लागेल, हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live