कोरोनाच्या संकटात जागतिक युद्ध होणार? जागतिक युद्धाला अमेरिकेचं खतपाणी?

साम टीव्ही
बुधवार, 8 जुलै 2020
  • कोरोनाच्या संकटात जागतिक युद्ध होणार का?
  • जागतिक युद्धाला अमेरिकेचं खतपाणी?
  • चीनची आता अमेरिकेविरुद्ध ओरड

कोरोनाच्या संकटात जगावर महायुद्धाची टांगती तलवार आलीय आणि या संभाव्य महायुद्धाला अमेरिका खतपाणी घालत असल्याचा आरोप चीनने केलाय. चीननं काय केलाय खळबळजनक दावा, पाहा...

हे चित्र जगभरात दिसू शकतं, कारण चीनने आता जागतिक महायुद्धाचे ढग गरजू लागल्याचा दावा केलाय आणि त्याला जागतिक महासत्ता अमेरिका खतपाणी घालत असल्याचा आरोपही चीननं केलाय. इतकंच नाही तर चीनसोबत वाद सुरू असलेल्या देशांना पाठिंबा देऊन अमेरिका युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत असल्याचा दावाही चीनकडून करण्यात आलाय. जगभरातील बड्या देशांमध्ये भांडणं लावण्याचा उद्योग अमेरिका करत असल्याचा संशयही चीनने व्यक्त केलाय.
 

अमेरिकेने चीनसोबत वाद सुरू असलेल्या देशांना हाताशी धरलंय. आर्थिक आणि व्यापारी पातळ्यांवर महासत्ता बनण्यासाठी अमेरिकेने हे कारस्थान सुरू केलंय. इतकंच नाही तर, कोरोनाच्या संकटाचा वापर अमेरिका आगामी निवडणुकांसाठी करत असल्याचा गंभीर दावाही चीनने केलाय. चीनचे संबंध आधीच अनेक देशांसोबत बिघडलेले आहेत. त्यामुळे चीन काहीही बरळत असल्याचं समोर आलेलं आहेच. मात्र तरीही, चीनने अमेरिकेवर केलेले आरोप जर खरे असतील तर जागतिक महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live