हिवाळ्यात कोरोनाचा कहर वाढणार? IIT भुवनेश्वर आणि एम्सचा धक्कादायक अहवाल 

साम टीव्ही
सोमवार, 20 जुलै 2020

 

  • हिवाळ्यात कोरोनाचा कहर वाढणार ?
  • IIT भुवनेश्वर आणि एम्सचा धक्कादायक अहवाल 
  • बदलत्या तापमानाचा कोरोनावर परिणाम ?

कोरोना संकटात आता तुमची आमची चिंता वाढवणारी बातमी...हिवाळ्यात कोरोनाचा कहर आणखी वाढू शकतो. एका अभ्यानुसार हा दावा करण्यात आलाय. हिवाळ्यात नेमकं काय होईल..पाहुयात 

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतोय. पावसाळा सुरू होताच कोरोना रूग्णांची आकडेवारी दुपटी, तिपटीनं वाढलीय. त्यात आता हिवाळ्यात कोरोनाचा आणखी कहर पाहायला मिळेल असा धक्कादायक दावा करण्यात आलाय. IIT-भुवनेश्वर आणि एम्सनं संयुक्तरित्या केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब समोर आलीय. हिवाळ्यात तापामानात घट होईल आणि त्यामुळेच रूग्णसंख्या वाढू शकते असा दावा या अहवालातून करण्यात आलाय. 

भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या 11 लाख 18 हजार 43 इतकी आहे. यामध्ये 27 हजार 497 जणांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे, 7 लाख 87 जणांनी करोनावर मात केलीय. तर सद्यस्थितीत देशात 3 लाख 90 हजार 459 जणांवर उपचार सुरू आहेत.

फायनल व्हीओ - वातावरणानुसार माणसाची रोगप्रतिकारक क्षमता कमी जास्त होत असते. शिवाय यापूर्वी आलेला सार्स सारखा आजारही बदलत्या तापमानानुसार प्रभाव दाखवत असल्याचं निदर्शनास आलाय. त्याचाच दाखला देत हा नवा दावा करण्यात आलाय. अर्थात असं असलं तरी उन्हाळ्यात कोरोना विषाणू तग धरणार नाही असाही एक दावा यापूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे हिवाळ्यात कोरोना रूग्णांची संख्या खूप मोठी असेल या दाव्याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live