73 दिवसात भारताची कोरोना लस येणार? पाहा, काय आहे सत्य?

साम टीव्ही
रविवार, 23 ऑगस्ट 2020

 

  • 73 दिवसात भारताची कोरोना लस येणार?
  • सिरमची लस आता काही दिवसातच बाजारात येणार?
  • केंद्र सरकार 68 कोटी डोस खरेदी करणार?

कोरोनावर भारताची पहिली लस 73 दिवसांत मिळणार असल्याचा दावा करण्यात येतोय. या दाव्यात कितपत तथ्य आहे? य़ाची आम्ही पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं? तुम्हीच पाहा

भारताची पहिली कोरोना लस 'कोविशिल्ड' 73 दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असा दावा करण्यात येतोय. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलीय. भारत सरकारकडून विशेष संधोधन प्राधान्य परवाना सिरमला मिळालाय. त्यामुळे आता 2 महिन्यात ही लस बाजारात येईल असा दावा केला जातोय.

दरम्यान 73 दिवसात सिरमची लस बाजारात येईल, हा दावा सिरम इन्स्टिट्यूटनं मात्र फेटाळलाय. अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांनी 73 दिवसातलं लसीसंबंधित वृत्त खोटं असल्याचं म्हटलंय.

अवघं जग कोरोनावर रामबाण उपाय ठरणाऱ्या लसीची आतुरतेनं वाट पाहतंय. कोविशिल्डच्या सर्व चाचण्या एकदा यशस्वी झाल्या आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ही लस विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आशा करुयात की लवकरात लवकर ही लस बाजारात येऊन प्रत्येक भारतीयाला मिळेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live