कोरानाग्रस्तांच्या यादीत  भारत चीनला मागे टाकणार ? 

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 15 मे 2020

गेल्या आठवड्याभरात देशात दर दिवशी तीन ते साडे तीन हजार रूग्णांची भर पडत आहे. पंरतु, देशासाठी हा संसर्ग नवीन असताना देखील त्यासंबंधी योग्य पावले पूर्वीच उचलण्यात आले असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. पंरतु, वैद्यकीय तपासण्यांचा वेग वाढवण्यास थोडा उशीर झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. 

नवी दिल्ली :  येत्या आठवड्याभरात देशातील एकूण रूग्णसंख्येचा आकडा चीनहून अधिक होईल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. असे झाले, तर जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत 11 व्या क्रमांकावर पोहचेल. गेल्या सात दिवसात भारत पेरू देशाला मागे टाकत 13 वरून 12 व्या स्थानावर पोहचला आहे. 

 गेल्या आठवड्याभरात देशात दर दिवशी तीन ते साडे तीन हजार रूग्णांची भर पडत आहे. पंरतु, देशासाठी हा संसर्ग नवीन असताना देखील त्यासंबंधी योग्य पावले पूर्वीच उचलण्यात आले असल्याचे मत वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. पंरतु, वैद्यकीय तपासण्यांचा वेग वाढवण्यास थोडा उशीर झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. 

जगातील इतर देशांचा विचार केला तर अमेरिका, युके, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँन्डमध्ये रूग्णसंख्या कमी होत आहे. पंरतु, इरान, स्पेन, ब्राझील, फ्रान्स, इटलीत हा आलेख अजूही वाढतात आहे. फ्रान्समध्ये 24 जानेवारीला, इटलीत 31 जानेवारी, स्पेनमध्ये 1 फेब्रुवारी, ब्राझीलमध्ये 26 जानेवारी, तर जर्मनीत 27 जानेवारीला पहिला सर्गग्रस्त आढळला होता.

भारतात 10 लाख पैकी 2 रूग्णांचा संसर्गामुळे मृत्यू  होत आहे. तर, चीन मध्ये हा आकडा 3 आहे. 10 लाखांमध्ये भारतात 57 तर चीनमध्ये 58 लोकांमध्ये संसर्ग आढळून येत आहे. 

चीन मध्ये 80.9 सौम्य, 13.8 गंभीर तसेच 4.7 रूग्ण अतिगंभीर स्थितीत आहेत. भारतात मात्र 63 टक्के रूग्णांमध्ये कुठलेही लक्षणे आढळली नाहीत. 17 टक्के रूग्णांमध्ये सौम्य, 15 टक्के रूग्णांमध्ये गंभीर तसेच 5 टक्के रूग्ण अतिगंभीर अवस्थेत आहेत.  

वर्ल्डमीटर संकेतस्थळानूसार भारताचा कोरोनामुक्तीचा दर 34 टक्के आहे. तर, चीनमध्ये 87 टक्के दरानूसार आतापर्यंत 78 हजार 195 रूग्ण संसर्गमुक्त झाले आहे. 

 चीन मध्ये संसर्गग्रस्तांची संख्या 84 हजार 24 झाली असून 4 हजार 637 जणांचा मृत्यू झाला आहे. चीन च्या तुलनेत देशातील रूग्णसंख्येने 78 हजारांचा टप्पा ओलांडला असून 2 हजार 548 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीवरून चीन पेक्षा भारताची स्थिती बरीच नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. 

देश गेल्या 100 दिवसांपासून कोरोना संसर्गासोबत दोन हात करीत आहे. केरळमध्ये 30 जानेवारीला पहिला कोरोनाबाधित आढळून आला होता. अश्यात हळूहळू देशातील रूग्णसंख्येचा आकडा चीनच्या एकूण रूग्णसंख्येच्या जवळपास पोहचत असल्याचे दिसून येत आहे.

संसर्गासंबंधी चीन तसेच भारतामध्ये काही समानता तर काही विविधता दिसून येते. दोन्ही देशामध्ये बहुतांश संसर्गग्रस्तांमध्ये सौम्य तर काहींमध्ये लक्षणे दिसून आली नाहीत. देशातील रूग्णसंख्या जरी चीन एवढी होत असली, तरी चीनमध्ये जास्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिंस विद्यापीठाच्या अभ्यासानूसार पहिल्या चार आठवड्यांमध्ये (28 दिवस) चीनमधील रूग्णसंख्या 70 हजारांच्या घरात होती. पंरतु, भारतात 104 दिवसांमध्ये एवढे रूग्ण आढळले. भारतात सध्या 49 हजार 571 सक्रिय केस आहेत, तर चीन मध्ये हा आकडा 101 आहे. यातील 9 रूग्ण अतिगंभीर स्थितीत आहेत. 

 

WebTittle :: Will India overtake China in Koran list?


  


संबंधित बातम्या

Saam TV Live