चिंताजनक! कोरोनामुळे कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या जाणार...

साम टीव्ही
शुक्रवार, 22 मे 2020
  • कोरोनाच्या राक्षसाने मारलीय तुमच्या नोकरीवरही कुऱ्हाड
  • कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती
  • आयुष्यावर घाव घालणाऱ्या कोरोनाची पोटावरही लाथ

 अनेकांच्या जीवावर उठलेला कोरोना, आता लोकांच्या नोकऱ्याही खाणार आहे. तशी धक्कादायक माहिती समोर आलीय. कोरोनाच्या संकटामुळे कुणाच्या नोकऱ्या जाणार आहेत.वाचा संपूर्ण

कोरोनाचं संकट आल्यापासून लोकांचं जगणं बदलून गेलंय. सगळ्याच क्षेत्रात होत्याचं नव्हतं होऊन बसलंय. कोरोना आपल्या आरोग्याचं नुकसान करतो आहेच, पण अनेकांच्या जीवावर उठलेला कोरोना आता लोकांच्या पोटावरही लाथ मारणारेय. कारण या सगळ्या संकटात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या जाणारेत. भारतातील अनेक लोकांना घरी बसावं लागणारय. तशी धक्कादायक माहिती समोर आलीय.

अशा जाणार नोकऱ्या?
किरकोळ आणि होलसेल व्यापार क्षेत्रात 4 कोटी 60 लाखांपैकी तब्बल 60 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणारेयत. तसेच वाहनं बनवणाऱ्या कंपन्यांत काम करणाऱ्या 50 लाख कामगारांपैकी 30 लाख लोक बेरोजगार होणारेयत. त्याचप्रमाणे रीअल इस्टेट क्षेत्रांतील 7 कोटी लोकांपैकी 1 कोटी 40 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणारेयत. ट्रॅव्हल्स, पर्यटन आणि हॉटेलिंग क्षेत्रातील 6 कोटी 30 लाख लोकांपैकी 4 कोटी लोकांच्या नोकरीवर कुऱ्हाड येणारेय. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या 1 कोटी 80 लाख लोकांपैकी 4 कोटी लोक बेरोजगार होणारेयत.

जगभरात कोरोनानं अनेकांचे जीव घेतलेयच, मात्र त्याचसोबत कोरोना आता लोकांच्या नोकऱ्याही खाऊ लागलाय. त्यामुळे कोरोनाच्या संकटाएवढंच बेरोजगारीचं मोठं संकट उभं ठाकलंय. त्यामुळे या संकटातही लोकांच्या नोकऱ्या जाऊ नयेत, प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं याची खबरदारी कपंन्या आणि सरकार पातळीवर घ्यावी लागणारेय. तरच, नोकरी करणारा आणि त्याच्यावर अवलंबून असणारी कुटुंबं देशोधडीला लागणार नाहीत...
 


संबंधित बातम्या

Saam TV Live