आता एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार मिळणार 

आता एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार मिळणार 

मुंबई : महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व इतर ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे ज्या कर्मचाºयाचे पूरस्थितीमुळे नुकसान झाले असेल, अशा कर्मचाºयांनी विभाग प्रमुखाकडे आगाऊ पगारासाठी अर्ज करावा. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील संपूर्ण देण्यात यावा.पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या एसटी कामगारांना तीन महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे.

आगाऊ पगार सलग ३६ महिने हप्त्यातून वसूल केला जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. महसूल यंत्रणेकडून एसटी कामगारांना पूरग्रस्त असल्याचा प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना आगाऊ पगार दिला जाईल. 

 एसटी कर्मचारी कर्तव्यासाठी डेपोत येऊनसुद्धा त्यांना कर्तव्य बजावता आले नाही. यासह काही कर्मचाºयांना पुरस्थितीमुळे कर्तव्यावर पोहोचू शकले नाही, अशा कर्मचाºयांना विशेष रजा मंजूर करावी, अशी मागणी एसटी कामगार संघटनेच्या वतीने केली जात आहे.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथील एसटी विभागाला सर्वात जास्त फटका बसला. या विभागातून एसटी न चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. 

Web Title: Will pay three months salary to ST staff
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com