राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार?

SAAM TV
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या दरात सवलतीची शक्यता
राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार?
राज्य सरकार इंधनावरील सेस कमी करण्याच्या तयारीत?
राज्य सरकार सामान्यांना देणार दिलासा?

पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे होरपळणाऱ्या सामान्यांना लवकरच राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.पुढील महिन्यात सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यताय.या निर्णयाने राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची माहिती अर्थ खात्यातील सुत्रांनी दिलीय.राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोडी कपात केली जाण्याची शक्यताय.राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी मागील सरकारने 2018 साली पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून 2 रुपये सेस आकारला होता.आता दुष्काळ सदृश्य परिस्थिती नसल्याने हा सेस सरकार बंद करणार का आणि त्यामधून सामान्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणारे.

 

मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता
- राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची अर्थखात्यातील सूत्रांची माहिती
- पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते
- येत्या ८ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकसल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो
- राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तेव्हाच्या राज्य सरकारने २०१८ साली पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून २ रुपये सेस आकारला होता
- आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे
- राज्य सरकार व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारत आहे
- यातील सेस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता

 


संबंधित बातम्या

Saam TV Live