पुढील लॉकडाऊनचा निर्णय आज होणार? राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 11 एप्रिल 2020

देशातील लॉकडाऊन उठणार की वाढणार याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मोदींनी जाहीर केलेला लॉकडाऊन चौदा एप्रिलला संपतोय. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज देशातील मुख्यमंत्र्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

देशातील लॉकडाऊन उठणार की वाढणार याबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मोदींनी जाहीर केलेला लॉकडाऊन चौदा एप्रिलला संपतोय. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज देशातील मुख्यमंत्र्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत...त्यानंतर मोदी  पुन्हा एकदा देशाला संबोधित करत, ल़ॉकडाऊनविषयी आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यताय. अनेक राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन वाढवला जावा अशी मागणी केलीय. ओडिशाने तर एक मेपर्यंत आधीच लॉकडाऊन वाढवलाय.. तर महाराष्ट्रासह इतर राज्यसुद्धा लॉकडाऊन वाढीच्या बाजून आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी लॉकडाऊनबाबात काय भूमिका घेतात, याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

14 एप्रिलनंतर केद्र व राज्य सरकार लॉकडाऊन वाढविणार की टप्प्याटप्पयाने यामध्ये शिथिलता आणणार, याबाबत सध्या कोणतेही निश्चित धोरण नाही. विभागामध्ये या दोन्ही संभाव्य बाबींची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवावी. ग्रामीण भागातील पाण्याचे रोटेशनप्रमाणे योग्य वाटप होईल, याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णाची कोवीड केअर, कोवीड आरोग्य केंद्र व कोवीड हॉस्पिटल (सौम्य ते गंभीर )अशी त्रिस्तरीय विभागणी करुन वैद्यकीय उपचार करावेत. यामुळे उपचारावरील ताण कमी होईल. अडकलेले प्रवासी, मजूर यांची अन्न व निवासाची व्यवस्था करन बेघर नागरिकांचीही नाईट शेल्टर अथवा शाळेत निवारा व भोजनाची व्यवस्था करावी.साखर कारखाना क्षेत्रातील मजूर स्थलांतरीत होणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

कोरोनाची लागण झालेल्या आणखी तिघांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या मृतांची संख्या 28 झाली आहे. मृतांमध्ये 30 वर्षांच्या तरूणाचा समावेश आहे.
दरम्यान, दिवसभरात शहरातील विविध भागांतील 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. पुण्यात कोरोनाचे 219 रुग्ण आहेत. दरम्यान, महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयांतील कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

मृतांमध्ये भवानी पेठेतील 55 वर्षांच्या महिलेचा समावेश असून, त्यांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना 1 एप्रिलला रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याच पेठेतील 69 वर्षांच्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. त्यांना सात एप्रिलला रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील 30 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला असून, पाच एप्रिलपासून तो रुग्णालयात होता. शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या तिघांना अन्य आजारही होते. शहराच्या विविध भागांतील नागरिकांची आरोग्य तपासणी करून, गरजेनुसार त्यांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ज्यांना ताप, सर्दी, खोकला आहे, अशा लोकांना लगेचच रुग्णालयांत नेले जात असल्याचे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.


संबंधित बातम्या

Saam TV Live