नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार?

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

नवी दिल्लीः  रेल्वे प्रशासनाने या दरवाढीचे संकेत दिले आहेत. रेल्वेच्या सर्व श्रेणीतील प्रवास महागणार असून रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी हे संकेत दिले आहेत. नवीन वर्षात रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकिटासाठी जास्तीचे पैसे मोजण्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. कारण नवीन वर्षात रेल्वे प्रवास २० टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता आहे.

रेल्वे बोर्डाने नवीन दरांचा आराखडा तयार केला आहे. रेल्वे कडून हे दर वाढवल्यानंतर रेल्वेच्या खात्यात प्रति वर्ष चार हजार कोटी रुपये ते पाच हजार कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. रेल्वे बोर्डाला झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा होती. आता निकालाची घोषणा झाल्याने लवकरच ही दरवाढ होणार आहे. रेल्वे प्रवास पाच पैसे प्रती किलोमीटर ते ४० पैसे किलोमीटरपर्यंत दरवाढ होवू शकते. म्हणजेच रेल्वे प्रवास १० ते २० टक्के वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय समितीच्या शिफारशी आणि आर्थिक तूट भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. संसदीय समितीच्या शिफारशीनंतर पंतप्रधान कार्यालय कडून याला मंजुरी मिळाली आहे. 

Web Title:  Will rail travel be expensive in the new year?

संबंधित बातम्या

Saam TV Live