कोरोनाचा समूळ नायनाट होणार? कसा? वाचा

साम टीव्ही
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020
  • लस देण्यासाठी सुईचा वापर केला जाणार नाही
  • जेट इंजेक्शनद्वारे दिली जाणार लस 
  • लसीमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल
  • कोरोना विषाणूचा समूळ नायनाट करण्यास मदत होईल
  • सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच दिली जाणार लस 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचं आणखी एक रूप पाहायला मिळतंय. ते म्हणजे एकदा लागण झालेल्या रूग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झालीय. 
बेल्जियम, नेदरलँड्पाठोपाठ भारतातही अशी उदाहरणं समोर आली आहेत. मात्र फारशी काळजी करण्याचं कारण नाही. कारण कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कंबर कसलीय. कोरोना वर्गातील सर्वच विषाणूंवर परिणामकारक ठरणाऱ्या लसीसाठी केंब्रिजचं संशोधन सुरू आहे. वर्षअखेरीपर्यंत त्याच्या चाचण्या सुरू करण्यात येतील. वटवाघळांसह अनेक प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या निरनिराळ्या कोरोना विषाणूंचा भविष्यात धोका उद्भवू नये, यासाठी केंब्रिज विद्यापीठाकडून 'डायओस-कोवॅक्स 2' असं नाव असलेली ही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

ही लस देताना सुईचा वापर केला जाणार नाही. खास जेट इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाईल. या लसीमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. शिवाय कोरोना विषाणूचा समूळ नायनाट करण्यास मदत होईल. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच ही लस दिली जाईल.

 या लशीचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे ती गोठवणाऱ्या तापमानात पावडर स्वरूपात जतन केली जाईल. यामुळे त्यावर उष्णतेचा परिणाम होणार नाही आणि ती शीतपेटीत ठेवण्याची गरज भासणार नाही. यामुळेच तिच्या वाहतूक आणि साठवणूक प्रक्रियेसाठी खर्च येणार नाही तसच जगातील गरीब आणि मध्यम आर्थिक गटातील देशांवर भार पडणार नाही. त्यामुळे केंब्रिजचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर ही लस जगासाठी संजीवनी ठरेल. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live