Pooja Chavan case | संजय राठोड राजीनामा देणार का? संजय राठोडांबाबत शिवसेनेची चुप्पी

साम टीव्ही
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021
  • संजय राठोड राजीनामा देणार का?
  • संजय राठोडांबाबत शिवसेनेची चुप्पी
  • उद्धव ठाकरे काय कारवाई करणार?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी  केलीय. त्यामुळे राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय. 

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय.

सध्या समाज माध्यमांमध्ये पीडित तरूणी आणि मंत्री महोदयांदरम्यान झालेल्या कथित संभाषणाच्या ध्वनिफिती फिरतायत. त्याआधारे राठोड यांच्यावर कारवाईची मागणी होतेय. मात्र सत्ताधारी पक्ष या प्रकरणी सारवासारव करू पाहतोय.
 

शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून संजय राठोड यांची ओळख आहे. भाजप आणि काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या विदर्भातला शिवसेनेचा बडा नेता म्हणून पक्षासाठी राठोड यांची उपयोगिताही मोठी आहे. त्यातच राठोड यांचा राजीनामा घेतल्यास विरोधकांच्या दबावामुळे शिवसेनेच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला,असं चित्रं निर्माण होईल. म्हणूनच राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करणं शिवसेनेसाठी अडचणीचं आहे. आता पाहायचं इतकंच की या प्रकरणाचं सत्य बाहेर येईपर्यंत नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांचा राजीनामा घेणार का? 


संबंधित बातम्या

Saam TV Live