जॉन्सन बेबी केअर उत्पादने कायम बाळाची त्वचा ध्यानात घेते. यामुळे गेल्या १२५ वर्षांपासुन सुरक्षाविषयक निकषांची पूर्तता करण्याची शिस्त काटेकोरपणे पाळली आहे आणि अगदी आजही त्यांचा दर्जा आवश्यक त्या निकषांप्रमाणे टिकविला आहे.
जॉन्सन बेबी केअरच्या सर्व उत्पादनांनी वैद्यकीय चाचण्या अत्यंत अचूकपणे पूर्ण केल्या आहेत. जेव्हा आपल्या बाळाच्या त्वचेची काळजी घेण्याचा विषय येतो तेव्हा आई-वडिलांनी कोणतीही गोष्ट गृहीत धरायला नको. बाळासाठी हानिकारक बेबी केअर उत्पादने टाळून योग्य आणि १०० टक्के सुरक्षित उत्पादनेच निवडणे आवश्यक आहे. कारण बाळ प्रत्येक आई-वडिलांसाठी स्पेशल असते. अशा परिस्थितीत जागतिक बेबी केअर विज्ञान आणि प्रत्येक माता जॉन्सनच्या उत्पादनांवर आपला विश्वास ठेवते. कारण या उत्पादनांमध्ये बाळासाठी आवश्यक असणारी सुरक्षितता विषयक सर्व वैशिष्ट्ये आहेत. सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्यानंतर जॉन्सन बेबी केअर उत्पादने बाळाच्या त्वचेची पहिल्या दिवसापासून १०० टक्के कोमलतेने काळजी घेण्याची तसेच सुरक्षेची हमी देते.
जॉन्सन बेबी केअर उत्पादनांत घातक रसायनांना थारा नाही :
तुमच्या बाळाची नाजूक त्वचा ध्यानात घेऊन जॉन्सन बेबी केअरने सुरक्षित उप्त्पादने तयार केली आहेत. जॉन्सन बेबी केअरच्या माध्यमातून बाळासाठी निर्माण होणारी उत्पादने सर्वोत्तम आणि कोणत्याही घातक रासायनिक घटकांपासून मुक्त असतात. या शुद्ध आणि सौम्य उत्पादनांत पॅराबिन फ्री, तसेच फाथलेट्स, फॉर्मल्डिहाइड, एस्बेस्टोस आणि सल्फेट्स अशा घटकांचा समावेश नाही. जॉन्सन बेबी शॅम्पूचे उदाहरण बघूया, हा शॅम्पू 'एनएमटी' फॉर्म्युल्याप्रमाणे बनविण्यात आला आहे. ज्यामुळे बाळाच्या डोळ्यात फेस गेला तरी डोळ्यांची जळजळ होणार नाही याची खात्री आहे.
केवळ सुरक्षित घटक जॉन्सन बेबी केअर उत्पादनांचे महत्वाचे भाग आहेत :
जे घटक आपल्या बाळाच्या कोमल त्वचेची १०० टक्के काळजी पहिल्या दिवसापासून घेण्याची हमी देतात, अशाच घटकांना जॉन्सन बेबी केअर उत्पादनांमध्ये थारा मिळतो. आपल्या बाळाच्या नाजूक आणि कोमल त्वचेची तितक्याच कोमलतेने काळजी घेण्यासाठी उत्पादित करण्यात येणाऱ्या उत्पादनांची चाचणी घेण्यात येते. त्यातील घटकांना १२ महिने चालणाऱ्या कठोर दर्जा नियंत्रण चाचण्या पूर्ण करणे आवश्यक असते. त्यानंतरच हे घटक अंतिम उत्पादनाचा भाग बनतात. जॉन्सन बेबी पावडरला भारत सरकारच्या 'लॅबोरेटरी टेस्टिंग कमिशन'ची मान्यता मिळाली आहे.
निकष पूर्ण केल्याने जॉन्सन बेबी केअर उत्पादने सुरक्षित :
बाळाच्या कोमल त्वचेसाठी जॉन्सनची सर्व उत्पादने सुरक्षित आहेत. प्रत्येक स्तरावर वैद्यकीय चाचण्या केल्या जात असल्यामुळे ती उत्पादने बाळासाठी अधिक सुरक्षित आहेत. हा दर्जा प्राप्त करण्यासाठी सर्व उत्पादनांना चार कठोर चाचण्यांना सामोरे जावे लागते.
चाचण्या पुढील गोष्टींची खात्री करून घेण्यासाठी घेतल्या जातात :
- त्वचेची जळजळ होत नाही ना,
- शून्य ऍलर्जी,
- सूर्यप्रकाशामुळे शून्य रिऍक्शन.
भारतातील विभिन्न प्रयोगशाळांनी अनेक स्वतंत्र चाचण्या घेऊन, या उत्पादनांत कोणतेही हानिकारक रसायन नाही, अशा मान्यतेची मोहोर उमटवली आहे. जॉन्सन बेबी केअर उत्पादनांत वापरले जाणारे घटक आपल्या बाळाच्या कोमल त्वचेची 'पीएच' पातळी सांभाळतात असे प्रमाणित करण्यात आले आहे. तुमच्या बाळाला जळजळीचा किंवा 'ऍलर्जिक रिऍक्शन'चा त्रास होत नाही याची हमी जॉन्सन बेबी केअर उत्पादने देतात.
जागतिक नियामक मानकांचे पालन करणे जॉन्सन बेबी केअर उत्पादनांसाठी सक्तीचे :
बाळाच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने निवडताना ती उत्पादने जागतिक नियामक मानकांचे पालन करतात याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. 'जॉन्सन बेबी केअर'च्या सर्व उत्पादनांनी दर्जासाठी निर्धारित करण्यात आलेले जागतिक आणि स्थानिक पंधरा निकष यशस्वीतेने पूर्ण केले आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका आणि महासंघाने निर्धारित केलेले कठीण पातळीचे सुरक्षाविषयक पाच निकष पूर्ण केले आहेत. या चाचण्या जगभरात
५.५ लाख लोकांवर घेण्यात आल्या. या चाचण्या पूर्ण केल्यानंतरच जॉन्सन बेबी केअर उत्पादने आपल्या नवजात बालकांच्या त्वचेची सुरक्षा आणि काळजी घेण्यासाठी निर्धारित केलेले जागतिक निकष पूर्ण करीत आहेत.
Web Title: will take care of baby from his her first day