महराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

साम टीव्ही
शुक्रवार, 12 मार्च 2021

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
कोरोना आघाडीवर, लॉकडाऊन मानगुटीवर

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार की काय? अशी धास्ती प्रत्य़ेकालाच लागलीय. कारण महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्य़ाने वाढू लागलाय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनचे संकेत दिलेयत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्राला टोचेल अशी इशाऱ्याची लसही दिली... महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारे कोरोनाचे रूग्ण पाहता, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कडक लॉकडाऊन लावावं लागेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

महाराष्ट्रासह देशभरात करोनाचे रुग्ण वाढत असून, त्यात महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. महाराष्ट्रात रोज सरासरी १० हजार लोकांना कोरोनाची लागण होत आहे. त्याचसोबत, महाराष्ट्रात दररोज ७० ते ७५ जणांचे बळी जात आहेत. कालच्या दिवसात महाराष्ट्रात कोरोनाचे 13 हजार 659 नवे रूग्ण सापडलेयत. ही सगळी परिस्थिती पाहता, प्रशासनाने महाराष्ट्रातील अनेक भागांत अंशतः लॉक डाऊन सुरू केले आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागांत करोनाचे 'हॉट स्पॉट' निर्माण झाले आहेत.

कोरोनाचा आवळत चाललेला विळखा पाहता, लोकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सोशल डस्टन्सिंग, मास्कचा वापर करायला हवा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

VIDEO बापरे! यंदा उन्हाळा 6 महिन्यांचा असणार? पाहा कसा असेल परिणाम?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे सांगितलंय, त्याचा आपण विचार केला नाही तर, पुन्हा एकदा सुनसान स्टेशनं, ओस पडलेले रस्ते, बंद दुकानं आणि स्मशान शांतता असलेल्या बाजारपेठा आपल्याला पुन्हा एकदा पाहाव्या लागतील. आणि स्वत:ला घरातच कोंडून घ्यावं लागेल. भरीस भर म्हणून, रोजच्या रोज शेकडो कोरोनाबळींचे आकडे दुर्दैवाने पुन्हा एकदा पाहावे लागतील. अर्थात, गेल्यावर्षी सात-आठ महिने हे जगणं आणि भोगणं आपण सर्वांनी अनुभवलंय त्याचा कुणालाच विसर पडता कामा नये. 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live