रेमडेसिवीरच्या किंमती कमी करण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील

बुधवार, 7 एप्रिल 2021

कंपन्यांशी चर्चा करून रेमडेसिवीर इंजेक्शनचे (Remedesivir Injection) दर १३०० रुपयांपर्यंत नियंत्रणात ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेनी (Dr. Rajendra Shingane) मंगळवारी दिली आहे.​

मुंबई : कोरोना (Corona) साथीच्या रोगावर अनेक प्रकारच्या औषधांच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. परंतु काही औषधे या आजाराच्या उपचारप्रक्रियेत प्रभावी ठरली आहेत. यातच रेमडेसीवीर इंजेक्शनने संजीवनीची भूमिका बजावली आहे. कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा राज्यात पुरेसा ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याबाबत कंपन्यांशी चर्चा करून उत्पादनही वाढवायला सांगण्यात आले आहे. Will Try to Reduce Remidesivr Prices Say Rajendra Shingne

कंपन्यांशी चर्चा करून रेमडेसिवीर इंजेक्शनचे (Remedesivir Injection) दर १३०० रुपयांपर्यंत नियंत्रणात ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेनी (Dr. Rajendra Shingane) मंगळवारी दिली आहे. शिंगणे म्हणाले की, रेमडेसिवीर औषधाची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या देशात एकूण सात कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीची किंमत वेगळी आहे. 

काही कंपन्यांची किंमत आठशे आहे, तर काहींची साडेचार हजार रुपये  इतके आहे. औषधाची किंमत कमी करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे.त्यानुसार किंमत कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली असून, येत्या दोन दिवसांत त्यासंदर्भातले आदेश जारी होतील.कोरोना चाचणीचे दर राज्य सरकारने (Maharashtra Government) कमी केले आहेत. तसे रेमडेसिवीरची किंमत नक्की कमी होईल, असेही शिंगणे यांनी स्पष्ट केले. Will Try to Reduce Remidesivr Prices Say Rajendra Shingne

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live