लस भारतातच बनणार?, भारतीय कंपन्यांच्या संशोधनाकडे जगाचं लक्ष

साम टीव्ही
सोमवार, 25 मे 2020
  • भारत बनवतोय कोरोनाप्रतिबंधक 14 लसी.. 
  • भारतीय कंपन्यांच्या संशोधनाकडे जगाचं लक्ष
  • भारतात 4 लसी अंतिम टप्प्यात

कोरोनाला हरवायचं असेल तर एकच उपाय आहे. तो म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचा. भारत लस शोधण्याच्या दिशेनं वेगानं पुढे सरकतोय. अख्ख्या जगाचं लक्ष भारताकडे आहे.

कोरोना व्हायरसला पूर्णपणे हरवायचं असेल तर एकमेव उपाय आहे. तो म्हणजे लवकरात लवकर लस शोधण्याचा आणि कोरोनावर लस शोधण्याच्या बाबतीत भारत वेगानं पुढे सरकतोय. देशात 14 लसींची प्री-क्लिनिकल चाचणी सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या मते यापैकी 4 ते 5 लसी काही दिवसात पुढच्या टप्प्यात जातील. जागतिक आरोग्य संघटनेशी भारत समन्वय साधून आहे.

कोण कोण बनवतंय लस ? 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अमेरिकन कंपन्यांसोबत मिळून 3 प्रकारच्या लसी विकसित करत आहे. 

Zydus Cadila च्या दोन लसी आताच प्री-क्लिनिकल ट्रायलमधून पुढे जात आहेत.

भारत बायोटेक आता सुरुवातीच्या टेस्टिंग फेजमध्ये आहे.

इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडनं ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत टाय-अप केलंय.

Myvax बेंगळुरुचा एक स्टार्टअप प्रोजेक्ट आहे जो 18 महिन्यात लस तयार करण्याचा दावा करतंय.

हैदराबाद बायोलॉजिकल ईची लसही प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे

जगभरात 100 हून अधिक कंपन्या कोरोना प्रतिबंधक लसीवर काम करत आहेत जेव्हा जग संकटात येतं, तेव्हा भारत संकटमोचक म्हणून पुढे आलाय. Y2K सारखा संगणक प्रणालीतील अडसरही भारतीय तज्ज्ञांनीच दूर केला होता. तेव्हा आशा करुयात की जगाला कोरोनापासून वाचवणारी लस भारतातच बनेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live