'लस येण्यापूर्वीच कोरोना संपणार', जगावरचं संकट लवकर दूर होणार?

साम टीव्ही
सोमवार, 18 मे 2020
  • कर्दनकाळ कोरोनाचा अंत जवळ?
  • लस येण्यापूर्वीच कोरोना संपणार?
  • जगावरचं संकट लवकर दूर होणार?

आता बातमी आहे, एक मोठ्या आणि दिलासायक दाव्याची. कोरोनावर लस कधी येणार? या प्रतीक्षेत अख्खं जग आलेलं असताना. कोरोना लस येण्यापूर्वीच संपू शकतो, असा दावा करण्यात आलाय. कुणी केलाय हा दावा? पाहा.

संपूर्ण जग कोरोनावर लस शोधण्याच्या मागावर आहे. आपण सगळे सुद्धा याचीच प्रतीक्षा करतोय. अशात WHOच्या एका माजी अधिकाऱ्यांनी एक दिलासा देणारा दावा केलाय. कर्करोग कार्यक्रमाचे संचालक राहिलेल्या प्रोफेसर करोल सिकोरा यांनी कोरोना 
विषाणूबद्दल एक दावा केलाय. लस शोधण्यापूर्वीच कोरोना संपून जाईल.. असं सिकोरा यांनी म्हटलंय.

'लस येण्यापूर्वीच कोरोना संपणार'

कोरोना विषाणूविरूद्ध सर्वत्र सारखाच प्रकार दिसतो. मला शंका आहे की आमच्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती आहे. आपल्याला हा व्हायरस सतत कमी करायचा आहे, पण तो स्वतःच खूप कमकुवत होऊ शकतो. हे शक्य आहे असा माझा अंदाज आहे.

मागच्या काही दिवसांत अनेकांनी अनेक दावे केले आहेत. त्यातलाच हा एक दावा असला, तरीह लस शोधण्यात कुठल्याच देशाला यश येत नसताना, काहीसा दिलासा देणारा आहे... जागतिक आरोग्य संघटनेत मोठी जबाबदारी निभावलेल्या व्यक्तीनं हा दावा करणं, हेही दुर्लक्षून चालणार नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live