चोरट्यांचा मोबाईल सोडून इंग्लिश दारूवर डल्ला, सीसीटीव्हीत चोरटे कैद

लक्ष्मण सोळुंके
शनिवार, 27 मार्च 2021

अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील रविराज हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये ठेवलेले मोबाईल पाहूनही चोरट्यांनी मोबाईलऐवजी इंग्लिश दारूवर डल्ला मारला आहे.

जालना : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील रविराज हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये ठेवलेले मोबाईल पाहूनही चोरट्यांनी मोबाईलऐवजी इंग्लिश दारूवर डल्ला मारला आहे. शटर वाकवून ही चोरी करण्यात आली असून चोरीची घटना भल्या पहाटे घडली आहे. (Wine Bottles stolen Away by Thieves From Hotel in Jalana)

ग्रँड मास्टर, मॅकडॉल,ब्लेंडर, आर.एस.आयबी या कंपनीच्या इंग्लिश दारूच्या बाटल्यांसह रम, ओसीब्ल्यू यांचे युनिट आणि नगदी ४०० रुपये असा एकूण ७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

चोरी करणारे आरोपी ३ जण असावेत अशी शंका पोलिसांनी (Police) व्यक्त केली असून यातील एक आरोपी १४ ते १५ वर्ष वयोगटातील असून दोघे २० ते २२ वर्षाचे असावेत. (Wine Bottles stolen Away by Thieves From Hotel in Jalana)

दोघांनी रेडिमेड शर्ट पॅन्ट घातले असून एकाने काळ्या रंगाचे स्वेटर किंवा जॅकेट घातले आहे तर दुसरा लाल रंगाचे हुडी घातले आहे. लाल रंगाचे हुडी जॅकेट वर काहीतरी YA..असे काहीतरी पांढऱ्या अक्षरात लिहलेले आहे. दोघांनी चप्पल घातली आहे.  हॉटेलमधील मोबाइल, सिगारेट चोरीला गेले नाहीत. त्यामुळे चोरट्यांचा उद्देश केवळ दारू चोरण्याचा असावा अशीही शंका उपस्थित झाली आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live