मद्यप्रेमींची बियर ऐवजी आता वाईनला पसंती; ग्रामीण भागात सर्वात जास्त विक्री.. 

संदीप नागरे
शुक्रवार, 4 जून 2021

महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीचे आर्थिक गणित अवलंबून असलेल्या मद्य विक्रीत अनेक नवनवे प्रकार येत असतात.  मात्र, गेल्या दोन वर्षांपासून, मद्यप्रेमी  आपल्या मद्यात अमुलाग्र बदल केल्याचं पहायला मिळत आहे. देशभरात लॉक डाऊन कालावधीत अनेक महिने वाईन, बार बंद होते. शासनाने अनेकदा दारू विक्रेत्यांनी दारू ग्राहकांना देण्यास सवलत दिली होती

हिंगोली : महाराष्ट्र Maharashtra राज्याच्या तिजोरीचे आर्थिक गणित अवलंबून असलेल्या मद्य विक्रीत अनेक नवनवे प्रकार येत असतात.  मात्र, गेल्या दोन वर्षांपासून, मद्यप्रेमी  आपल्या मद्यात अमुलाग्र बदल केल्याचं पहायला मिळत आहे. देशभरात लॉक डाऊन Lockdown कालावधीत अनेक महिने वाईन Wine, बार Bar बंद होते. शासनाने अनेकदा दारू विक्रेत्यांनी दारू ग्राहकांना देण्यास सवलत दिली होती, दारूची दुकाने उघडताच दुकानांच्या बाहेर रांगाच रांगा लागल्याचे चित्र महाराष्ट्र भर पहायला मिळालं आहे. Wine lovers now prefer wine to beer 

मात्र, हिंगोली Hingoli जिल्ह्यात मद्यप्रेमींच्या बाबतीत नवा प्रकार पहायला मिळत आहे. दर वर्षी सर्वाधिक पसंत असलेल्या बियर मद्यप्रेमी रिचवत होते. आता या बियर मद्याची विक्री मोठ्या प्रमाणात घटून सर्वात जास्त वाईन कडे मद्यप्रेमी वळले आहेत. पूर्वी कार्पोरेट पार्ट्यांमध्ये देखील बियर हे मद्य वापरले जायचे. आता तिथे देखील या मद्याचा जास्त वापर होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

नोकरी देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश...  

विशेष म्हणजे २०१९- २० या वर्षात हिंगोली जिल्ह्यात विविध फळांपासून तयार होणारी ग्रेप्स वाईन केवळ चार हजार लिटर विक्री झाली होती. ती २०२०- २१ मध्ये  तब्बल दहा हजार लिटर विक्री झाल्याचं, राज्य उत्पादन शुल्क विभागान दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाल आहे. बियर हे मद्य थंड करून विक्री कराव लागत. मात्र, वाईन हे ग्राहकांना थंड करून प्राशन करता येत असल्याने, वाईन विक्री जास्त होत असल्याचं दारू विक्रेते सांगत आहेत. Wine lovers now prefer wine to beer

हे देखील पहा 

हिंगोली शहरातील अनेक वाईन शॉपी Wine shop मध्ये बिअर चा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मात्र तरी देखील ग्राहक पेक्षा इतर वाईन खरेदी करण्यास जास्त पसंती देत असल्याचे दारू विक्रेते सांगत आहेत. पूर्वी शहरातील City मद्यप्रेमी जास्त प्रमाणात ग्रेप्स वाइन प्राशन करताना आढळत होते. मात्र, आता ग्रामीण भागातील मद्यप्रेमी देखील या वाईन कडे त्यांचा कल वाढवल्याने महागड्या वाईन मधून शासनाच्या तिजोरीत महसूलच्या रूपाने भरपूर रक्कम जमा होत आहे. 

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live