दंडाची पावती न भरता चिरीमिरीवर मांडवली, पाहा हे पालिकेचं चिरीमिरी पथक

साम टीव्ही
गुरुवार, 4 मार्च 2021

औरंगाबादमध्ये विनामास्क कारवाई करणारं पथक वादात सापडलंय. या पथकांकडून पावती न घेता मांडवली केली जात असल्याचा आरोप होतोय. याच आरोपातून महापालिकेच्या पथकाला मारहाणही झाली. 

औरंगाबादमध्ये विनामास्क कारवाई करणारं पथक वादात सापडलंय. या पथकांकडून पावती न घेता मांडवली केली जात असल्याचा आरोप होतोय. याच आरोपातून महापालिकेच्या पथकाला मारहाणही झाली.

मास्क न लावणाऱ्यांवर औरंगाबाद महापालिकेनं कारवाई सुरु केलीय. विनामास्क असणाऱ्यांकडून पाचशे ते ५ हजारांचा दंड वसूल करणं सुरु आहे. पण या कारवाईलाही भ्रष्टाचाराची किड लागल्याचा आरोप होऊ लागलाय. गुलमंडी भागात एका विद्यार्थ्यावर कारवाई करताना माजी आमदार किशनचंद तणवाणी आणि पथकात वाद झाला. त्यावेळी तिथं हाणामारी झाली.

विनामास्क कारवाईच्या नावाखाली व्यापारी आणि दुकानदारांकडून पथक वसुली करत असल्याचा आरोप व्यापारी करतायत.

विनामास्क लोकांवर कारवाई व्हायलाच हवी. पण कारवाई करणाऱ्या पथकानंही प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. त्यांनी जर वसुली सुरु केली तर औरंगाबादकर आणि पथकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live