पत्नीच्या प्रियकरांना कंटाळून नवऱयाची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

अहमदाबादः पत्नीच्या तीन प्रियकरांना कंटाळून नवऱयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह तिच्या तीन प्रियकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गांधीधाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद नावाच्या व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी गांधीधाम येथील घरीइलेक्ट्रीकचा शॉक घेऊन आत्महत्या केली होती. प्रल्हादचा मेव्हणा (बहिणीचा नवरा) लालजी यांनी या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करणारा अर्ज केला होता. प्रल्हादला धानबाईच्या अनैतिक संबंधांबद्दल संशय आला होता.

अहमदाबादः पत्नीच्या तीन प्रियकरांना कंटाळून नवऱयाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह तिच्या तीन प्रियकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गांधीधाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद नावाच्या व्यक्तीने तीन महिन्यांपूर्वी गांधीधाम येथील घरीइलेक्ट्रीकचा शॉक घेऊन आत्महत्या केली होती. प्रल्हादचा मेव्हणा (बहिणीचा नवरा) लालजी यांनी या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करणारा अर्ज केला होता. प्रल्हादला धानबाईच्या अनैतिक संबंधांबद्दल संशय आला होता. प्रल्हादला अनैतीक संबंधांची माहिती समजल्यानंतर घरी येऊन त्यांनी धमकावणे सुरू केले होते. या छळाला कंटाळून प्रल्हाद यांनी 13 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती.

या प्रकरणी धानबाई माहेश्वरी, नरसिन्ह कोली, रवी शंकर माहेश्वरी आणि महेश माहेश्वरी या तिघांविरोधात सोमवारी (ता. 17) गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Woman and her 3 lovers drive husband to commit suicide


संबंधित बातम्या

Saam TV Live