कल्याण मध्ये लहान मुलाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महिलेस अटक

kalyan
kalyan

कल्याण :  मुले जन्माला येत नसल्यामुळे त्रासलेले पालक Parents दत्तक Adopt प्रक्रीयेनुसार मुले दत्तक घेण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत असतात. तर दुसरीकडे बेकायदेशीर Illegally दत्तक प्रक्रियेद्वारे मुलाची Child परस्पर खरेदी Buy विक्री Sale केली जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. Woman Arrested For Selling Child Illegally In Kalyan

मुल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांना हेरून, गरीब पालकांना पैशाचे आमिष दाखवत त्यांची मुले विकणाऱ्या महिलेला कल्याण Kalyan स्टेशन परिसरात जिल्हा महिला व बाल संरक्षण कक्षासह कल्याण क्राईम ब्रांचने रंगेहाथ अटक Arrest केली आहे. 

तसेच स्वताच्या मुलाची विक्री करणाऱ्या दांपत्याला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत या 5 महिन्याच्या चिमुरड्याला महिला बाल विकास विभागाच्या ताब्यात दिले आहे. मानसी जाधव ही महिला काही महिने डोंबिवलीतील जननी आशिष बालसुधारगृहात आयाचे काम करत होती.Woman Arrested For Selling Child Illegally In Kalyan

या काळात तिने मुले दत्तक घेण्यासाठी येणाऱ्या पालकाचे संपर्क क्रमांक मिळवत या केंद्रातील नोकरी सोडली. या दरम्यान तिला दत्तक प्रक्रिया किचकट असल्याची आणि पालकांना मुल दत्तक मिळण्यास काही वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहिती मिळाली.

यामुळेच तिने गरजू पालकांना हेरून त्यांना किचकट द्त्त्तक प्रक्रीयेविना मुले मिळवून देण्याचा गोरखधंदा सुरु केला. उल्हासनगर मधील एका गरीब दाम्पत्याला पैशाचे आमिष दाखवत त्यांना त्यांच्या मुलांपैकी एका मुलाची विक्री करण्यास तयार केले. Woman Arrested For Selling Child Illegally In Kalyan

यानंतर जननी आशिष नोंदणी येथे केलेल्या एका व्यक्तीला फोन करत आपल्याकडे एक ५ महिन्याचे बालक असून ते २ लाखात विकण्यास तयार असल्याचे सांगत व्यवहार सुरु केला. मात्र प्रक्रिया पूर्ण न करता बेकायदेशीरपणे मुल दत्तक घेणे योग्य नसल्याची कल्पना असलेल्या त्या कुटुंबाने या बेकायदा प्रक्रीयेबाबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार केली. 

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागाने कल्याण गुन्हे शाखेकडे तक्रार केली. गुन्हे शाखेचे पोलीस Police उपायुक्त कडलक यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचला. यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनाच बनावट ग्राहक बनविण्यात आले. Woman Arrested For Selling Child Illegally In Kalyan

शनिवारी सकाळी या बनावट ग्राहकांनी सदर महिलेकडून 5 महिन्याच्या बालकाची 1 लाख 60 हजार आणि 30 हजार अशा 1लाख 90 हजार रुपये किमतीत खरेदी केली. या दरम्यान सदर महिलेसह या बालकाच्या आई वडिलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर महिलेने यापूर्वी 2 ते 3 बालकांची विक्री केल्याची माहिती असून याप्रकरणी पोलीस चौकशी करणार आहेत. 

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संस्थात्मक संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, सामाजिक कार्यकर्ता रोहिणी शिरसाट,  क्षेत्रीय कार्यकर्ता कृष्णा मोरे यांनी पूर्ण केली. दरम्यान अशा कारवाई मुळे बेकायदेशीर मानवी तस्करीस निश्चितच आळा बसेल असा विश्वास रामकृष्ण रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com