सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत वाहक तार अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Woman dies due to broken electric wire fell on her body
Woman dies due to broken electric wire fell on her body

धुळे: तौत्के Tauktae वादळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून धुळ्यामध्ये Dhule सोसाट्याचा वारा सुरू आहे आणि या वाऱ्यामुळे धुळे शहरातील चाळीसगाव Chalisgaon रोड परिसरातील जय शंकर कॉलनी परिसरामध्ये राहणाऱ्या आशा येवले या 50 वर्षीय महिलेच्या अंगावर विजेची तार पडून शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची वाईट घटना घडली आहे. Woman dies due to broken electric wire fell on her body

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरासमोरील विद्युतवाहक तारांमध्ये स्पार्किंग Sparking होत असल्याची तक्रार संबंधित  वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली होती. तरी देखील याकडे वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हि दुर्घटना घडली आहे. 

हे देवल पहा -

वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या या गलथानपणामुळे आज सकाळी वीजतार अंगावर पडल्याने ५० वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील चाळीसगाव रोडवरील जयशंकर कॉलनीत आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. केवळ आणि केवळ वीज कंपनीच्या या गलथानपणामुळेच ही दुर्दैवी घडना घडल्याने नागरिकांमध्ये वीज कंपनीच्या या नाकर्तेपणाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. Woman dies due to broken electric wire fell on her body

शहरातील पाचकंदील परिसरातील फळविक्रेते राजेंद्र येवले परिवारासह चाळीसगाव रोडवरील जयशंकर कॉलनी परिसरात वास्तव्यास आहेत. आज सकाळी त्यांच्या पत्नी आशा राजेंद्र येवले या घंडागाडी आल्याने कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. तेव्हा घराशेजारून गेलेली वीजतार अचानक तुटून त्यांच्या अंगावर पडली. दुर्दैवाने वीजप्रवाह Electricity सुरू असल्याने आशा येवले यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे येवले यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

आशा येवले यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश सुरू केला. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच येवले यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमा झाली. त्यांच्याकडून वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविषयी तीव्र संताप व्यक्त होत होता.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com