वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलाच्या डोळ्यासमोर आईचा मृत्यू... ( पहा व्हिडिओ )

विश्वभूषण लिमये
बुधवार, 21 एप्रिल 2021

बार्शीतील रहिवासी बाई येडवे या 67 वर्षीय वृद्ध महिलेला अस्थमा आजारामुळे त्या आजारी होत्या. ऑक्सिजन बेड वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्यांचा सोलापूर मधील रंगभवन चौकात गाडीतच मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला आहे. 

सोलापूर: सोलापूर Solapur जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे Corona मृत्यूत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परंतु त्याचबरोबर इतर आजाराने सुद्धा दगावणाऱ्यांची संख्या हि जास्त आहे. बार्शीतील Barshi रहिवासी बाई येडवे या 67 वर्षीय वृद्ध महिला अस्थमा Asthama या आजाराने त्रस्त  होत्या. ऑक्सिजन बेड वेळेवर उपलब्ध न झाल्याने त्यांचा सोलापूर मधील रंगभवन चौकात गाडीतच मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला आहे. Woman dies due to lack of oxygen bed in Solapur

 
सोमवारी रात्री हा सर्व प्रकार घडला आहे. बाई येडवे यांचा कोरोना रिपोर्ट ही निगेटिव्ह आला होता. मात्र त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. श्वसनात अडचण येत असल्याने त्यांना धाप लागत होती.  यामुळे त्यांचा मुलगा शरद येडवे त्यांना घेऊन दिवसभर बार्शीतील सर्व रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर बेडच्या शोधात होता. मात्र कोरोना काळात कोरोना रुग्णांना बेड साठी वन वन फिरावे लागत आहे तर एखाद्या दुसऱ्या आजारासाठी बेड मिळणे अवघडच झाले आहे. तरीही ऑक्सिजन बेड शोधले असता त्यांना कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध झाला नाही. 

शेवटी मृत्यूशी झुंजणाऱ्या आईला घेऊन रात्री मुलाने सोलापूर गाठलं. मात्र बाई येडवे यांना सोलापूर मधील नामांकित हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर बेड अभावी ऍडमिट करता आलं नाही. अखेर शेवटी आईसाठी दुसऱ्या हॉस्पिटलच्या शोधात असणाऱ्या मुलाच्या डोळ्यासमोर त्या वृद्ध आईने आपले प्राण सोडले. अशी हृदयद्रावक घटना सध्या ठीक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे आपली आरोग्य यंत्रणा किती खिळखिळी होत चाललीय याच वास्तववादी चित्र या घटनेनं समोर आणलं आहे.

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live