सोलापुरात उपचाराअभावी महिलेचा मृत्यू; छोट्या मुलांसमोर घेतला अखेरचा श्वास...

विश्वभूषण लिमये
शनिवार, 24 एप्रिल 2021

घर देताय का घर,असे म्हणत मुलांसमोरच आईने अखेरचा श्वास घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील कोंडानगरात घडली आहे. उपचारासाठी या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र हॉस्पिटलने  कोरोनामुळे  ऍडमिट करून घेण्यास असमर्थता दर्शवली अन् उपचारांअभावीच छोट्या मुलांच्या मातेवर मृत्यू   ओढावला.

सोलापूर - घर देताय का घर,असे म्हणत मुलांसमोरच आईने Mother अखेरचा श्वास घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील कोंडानगरात घडली आहे. उपचारासाठी या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र हॉस्पिटलने Hospital कोरोनामुळे Corona ऍडमिट करून घेण्यास असमर्थता दर्शवली अन् उपचारांअभावीच छोट्या मुलांच्या मातेवर मृत्यू   Death ओढावला. Woman dies due to lack of treatment in Solapur

मागील 25 वर्षांपासून गंगा प्रकाश नाईकवाडी यांची झोपडी सोलापूर-अक्कलकोट Solapur मुख्य रस्त्याच्या Main road कडेला होती. नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या सोलापूर- गंगापूर या चौपदरी रस्त्याच्या विस्तारीकरणात गंगा यांच्यासह 50 ते 60 जणांच्या झोपड्या पाडून टाकल्याने त्या बेघर झाल्या होत्या. एकना एक दिवस सरकार पुनर्वसन करेल या आशेने वस्तीतील लोक मिळेल त्या ठिकाणी निवाऱ्याची सोय करून राहत आहेत.

दरम्यान गंगा नाईकवाडी यांची दुसरीकडे जाऊन राहण्याची कुवत नसल्याने पती प्रकाश,13 वर्षाची मुलगी ऐश्वर्या, 9 वर्षाचा मुलगा आकाश, चार वर्षाची मुलगी रेणुका आणि तिनं वर्षाचा मुलगा समर्थ या चार मुलांसह रस्त्याच्या कडेला झोपडीत त्या राहू लागल्या होत्या, त्यातच कोविडच्या संकटाने पतीचा रोजगार गेल्याने ते बेकार झाले होते.आज ना उद्या आपले पुनर्वसन होईल या आशेने ऊन,वारा,पाऊस यांचा मुकाबला करीत असताना मध्यंतरीच्या पावसामुळे त्यांनी आपले बिऱ्हाड जवळ असलेल्या पुलाखाली हलवले.

दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी गंगा या आजारी पडल्या वस्तीतील कांही होतकरू तरुणांनी पुढाकार घेत त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले. मात्र कोविडच कारण देत गंगा यांच्यावर उपचार करण्यास सिव्हिल हॉस्पिटल कडून असमर्थता दर्शवण्यात आली. त्यानंतर त्यांची तब्येत आणखी खालावली अन् त्यातच गंगा  यांचा मृत्यू झाला. Woman dies due to lack of treatment in Solapur

घर नसलेल्या आईची चार मुले पारखी झाली अन् वस्तीतील लोकांनी पैसा गोळा करून गंगा यांच्या अंत्यसंस्कार केले. गंगा यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेणार एवढ्यात काही संघटनांनी त्यास विरोध करीत मृतदेह वळसंग येथील महामार्ग कार्यालयात घेऊन जाण्याची तयारी केली. त्यांना न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाही असे ठरविले. मात्र कोविडच्या नियमांमुळे झालेल्या गर्दीमुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. जमावबंदीची कारवाई केली आणि शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत गंगा नाईकवाडी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

एकीकडे कोविडमुळे मरणाऱ्यांची संख्या भरमसाठ आहे. मात्र त्याचबरोबर कोविडमुळे बेघर होऊन उघड्यावर पडलेली अशी अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गंगा यांच्या जन्मदात्या आई-वडिलांना मुलीची तिरडी बांधावी लागली. अशा कित्येक तिरड्या आज  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बांधल्या जात आहेत आणि भूकबळीने एक एक जीव दिवसागणिक जात आहे. याला जबाबदार कोण असा  प्रश्न आता निर्माण होत आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live