महिलेनं दिला एकाच वेळी 5 बालकांना जन्म

सायली खांडेकर
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

जयपूर - राजस्थानच्या जयपूरमधे एका महिलेनं एकाच वेळी चक्क पाच बाळांना जन्म दिला आहे. पाचपैकी एका नवजात बाळाचा जन्मताच मृत्यू झाला आहे. तर तीन बाळांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एका बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. जयपूरमधील सांगानेर येथील महिला रुखसाना हिने जनाना रुग्णालयात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता एकाचवेळी पाच मुलांना जन्म दिला.

रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लता राजौरिया यांनी सांगितले की, 'रुखसानाची प्रकृती स्थिर आहे. चार नवजात बालकांना एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

महिलेची वेळेआधीच प्रसूती झाल्यामुळे सर्व बाळांचे वजन कमी आहे. त्यात दोन मुली आणि दोन मुले आहेत. तर, जन्मताच मृत्यू झालेला नवजात मुलगा होता. सर्व बाळांचे वजन एक ते १.४ किलो होते. वजन कमी असल्यामुळेच त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live