वाळूचा ट्रक तपासणीसाठी उभा केला म्हणून महिला तलाठीला केली मारहाण

Women talathi Nisha Pawra while inspecting a sand truck
Women talathi Nisha Pawra while inspecting a sand truck

नंदुरबार - नंदुरबारमधील Nandurbar भाजप नगरसेवक गौरव चौधरी Gaurav Choudhary यांनी वाळूचा ट्रक Sand truck अडविल्यामुळे तहसिलदार नियुक्त वाळु तपासणी पथकातील निशा पावरा Nisha Pavara तलाठींना मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. The woman hit the talathi as the sand truck stopped for inspection

या पथकातील निशा पावरा Nisha Pavara या महिला तलाठी यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहान केली आहे.  गौरव चौधरी यांच्या वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातमधुन महाराष्ट्रात वाळु वाहतुकीचा झिरो स्वामीत्व पावती नव्हती. यामुळे या तपासणी पथकाने दोन तास वाळु वाहतुक करणाऱ्या  ट्रकला अडवून ठेवले होते.  

हे देखील पहा - 

यानंतर ट्रकच्या ड्रायव्हरने ट्रक पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु निशा पावरासह अन्य दोन महिला तलाठी कर्मचारी यांनी तहसिलदार यांच्या वाहनातुन पाठलाग करुन ट्रक अडवला. 

यानंतर घटनास्थळी  नगरसेवक गौरव चौधरी पोहोचले आणि पथकातील महिला तलाठीमध्ये वाद सुरू झाला. यानंतर नगरसेवक गौरव चौधरी यांनी महिला तलाठीसोबत शिवीगाळ करत त्यांना धक्काबुकी करुन मारहान केली. 

यानंतर संतप्त तलाठींसह महसुलच्या सर्व अधिकारी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे नगरसेवक गौरव चौधरी यांनी या पथकावर वाळु ट्रक अडवुन पैशांची मागणी करण्याचा आरोप केला आहे. आपण कोणालाही मारझोड केली नसुन संबंधीत महिला तलाठी या पाय अडकुन खाली पडल्याचा त्यांना दावा केला आहे. त्यांच्या वाहनाच्या चालकांनी या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली आहे.

 दरम्यान या घटनेनंतर या पथकातील अन्य महिला तलाठी प्रचंड ताणतणावात असुन या प्रकरणी न्यायाची मागणी त्यांनी केली आहे.

Edited By - Puja Bonkile 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com