महिलांनो, कोरोना लसीबाबत काळजी नको, पण जाणून घ्या महत्त्वाचे...

साम टिव्ही ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

तुम्ही गर्भवती आहात?, तुमची मासिक पाळी सुरू आहे? तुम्ही बाळाला स्तन्यपान देता आहात?  मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही?  असे प्रश्न तुम्हाला पडलेत? थांबा....गोंधळून जाऊ नका.. आम्ही करतो तुमच्या शंकांचे निरसन..

पुणे  : तुम्ही गर्भवती Pregnant आहात?, तुमची मासिक पाळी Menstrual Cycle सुरू आहे? तुम्ही बाळाला स्तन्यपान Breast Feeding देता आहात?  मग कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची की नाही?  असे प्रश्न तुम्हाला पडलेत? थांबा....गोंधळून जाऊ नका.. आम्ही करतो तुमच्या शंकांचे निरसन. Women and Corona Vaccine answers to many questions

कोरोनाचा Corona वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीरकरण Vaccination आवश्यक आहे. त्यासाठी सरकार, वैद्यकीय यंत्रणा वेगाने पावले उचलत आहे. आता येत्या एक मेपासून १८ वर्षांवरील महिलांनाही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.  या वयात असणाऱ्या मुली आणि महिलांनी ही लस घ्यावी की नाही, याबाबत वाद-प्रवाद आहेत. याबाबत माहिती दिलीये  इंडियन मेडिकल असोसिएशनच्या IMA पुणे शाखेच्या माजी अध्यक्षा आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती निमकर यांनी....

प्रश्‍न : गरोदर महिला कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी का?
डॉ. निमकर : नाही. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये,’ असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये. Women and Corona Vaccine answers to many questions

प्रश्न : स्तन्यदा मातांनी लस घेणे योग्य ठरले का?
डॉ. निमकर -  नाही. ‘स्तन्यदा मातांना ही लस देऊ नये’ असे केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे स्तन्यदा मातांनी ही लस घेऊ नये.

प्रश्न :   पीसीओडी PCOD, ओव्हरी सिस्ट यासारख्या समस्या असल्यास लस घेणे योग्य आहे का?
डॉ. निमकर-  आजकाल अनेक मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये पीसीओडी, ओव्हरी सिस्टच्या समस्या दिसून येतात. या समस्या खूप दिवसांपासून सुरू असतात. त्यामुळे अशा आरोग्य विषयक समस्या असणाऱ्या महिलांनी देखील कोरोना प्रतिबंधक लस घेण्याला हरकत नाही. Women and Corona Vaccine answers to many questions

प्रश्न : मासिक पाळी असताना लस घ्यावी का?
डॉ. निमकर- मासिक पाळी सुरू असताना लस घेण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात लस घेतली तरी चालणार आहे. मात्र, कोणाच्या मनात काही शंका असल्यास एक मानसिक समाधान म्हणून मासिक पाळी येण्यापूर्वी आणि मासिक पाळीच्या पाच दिवसांत ही लस घेणे त्यांनी टाळावे.

प्रश्न : गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्यांनी महिलांनी लस घ्यावी का?
डॉ. निमकर- गर्भधारणा होण्यापूर्वी लस घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु गर्भधारणेची तुमची ट्रिटमेट काय आणि कशाप्रकारे सुरू आहे, त्याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रश्न : समजा, कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला आणि त्यानंतर गर्भधारणा राहिल्यास दुसरा डोस घ्यावा का?
डॉ. निमकर- तुम्ही कोरोना प्रतिबंधक लस पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर पहिला डोस घेतल्यानंतर आणि दुसऱ्या डोस घेण्यापूर्वीच्या कालावधीत तुम्हाला गर्भधारणा झाली असेल, तर तुम्ही दुसरा डोस घेऊ नका.


संबंधित बातम्या

Saam TV Live