VIDEO | नवव्या मजल्यावरून पडून महिला गायब

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
बुधवार, 29 जानेवारी 2020

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.या व्हिडीओत बघा, एक महिला बिल्डिंगवरून खाली पडताना दिसतेय. पहिला दुसरा मजला नाहीये.तर नवव्या मजल्यावरुन ही महिला खाली पडली.आता पुन्हा एकदा पाहा.नवव्या मजल्यावरून खाली पडणं म्हणजे जीव वाचेल याची गॅरेंटीच नाही.पण, या महिलेचं नशीब बलवत्तर.नवव्या मजल्यावरून पडली तरी ही महिला एकदम ठणठणीत. बघा, इतके तिकडे पाहिलं आणि पटकन उठून निघून गेली.एवढ्या उंचावरून ही महिला पडल्यामुळं सगळेजण तिच्या मदतीसाठी धावत गेले.पण, महिला स्वत:च उठली आणि निघून गेली.

खिडकीत काही काम करत असताना महिलेचा तोल गेला.आणि ही महिला बिल्डिंगखाली साचलेल्या बर्फात पडली.इतक्या उंचीवरुन खाली पडल्यानंतर महिला वाचेल की नाही हाच प्रश्न सगळ्यांना पडला.पण, ही महिला पडूनही काहीच न झाल्यासारखी उभी राहिली आणि शांतपणे चालत तिथून निघून गेली.हा व्हिडीओ पाहून आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये.

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक कॉमेंट्स केल्या जातायत.काहींनी तर आश्चर्य व्यक्त केलंय.तर काहीजण ही महिला एलियन असल्याचा दावा करतायत.32 सेकंदांचा हा प्रचंड व्हायरल झाला असून, 27 वर्षीय महिलेवर उपचारही सुरू असल्याचं बोललं जातंय.हा सगळा प्रकार रशियामध्ये पाहायला मिळालाय.

WebTittle :: Women disappear from the ninth floor

संबंधित बातम्या

Saam TV Live