वनविभागातील कर्मचारी महिलेचा दारुच्या नशेत धिंगाणा...(पहा व्हिडिओ)

अरूण जोशी
गुरुवार, 6 मे 2021

मेळघाट वनविभागातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत असतानाच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या लेखा विभागात एका कर्मचारी महिलेने दारूच्या नशेत कार्यालयात धिंगाणा व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

अमरावती : मेळघाट वनविभागातील Melghat Forest कर्तव्यदक्ष महिला अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण Deepali Chavan Suicide चर्चेत असतानाच अमरावती Amravati जिल्ह्यातील परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या लेखा विभागात एका कर्मचारी महिलेने दारूच्या नशेत कार्यालयात धिंगाणा व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Women Employee in Melghat Forest office Found Drunk

ही कर्मचारी महिला एवढी नशेत होती की तिने पोलिसांना Police देखील अर्वाच भाषेत शिवीगाळ केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कर्मचारी महिले विरुद्ध अचलपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे.परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयातील लेखा विभागात कार्यरत या महिलेने धिंगाणा घातला.

लस घेता का लस....भंडाऱ्यात जिल्हा प्रशासनाची लोकांमागे धावपळ

घटनेच्या वेळी ही कर्मचारी महिला नशेत होती, असा वैद्यकीय Medical विभागाचा अहवाल आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयातील लेखा विभागातील या महिलेला त्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ती महिला समजायला तयार नव्हती त्यामुळे नाईलाजाने अचलपुर पोलिसांना पाचारण करण्यात आले. Women Employee in Melghat Forest office Found Drunk

परंतु पोलीस आल्यानंतर ही कर्मचारी महिला एकूण घेत नव्हती. त्या महिलेने पोलिस कर्मचारी महिलेलाही ओरबाडले. या महिलेला दुपारच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले असता ती नशेत असल्याचे उघडकीला आले. दरम्यान तिने हा धिंगाणा का घातला? तिची तक्रार काय? आदी प्रश्नांची उत्तरे मात्र मिळू शकली नाहीत. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून या महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्याचा प्रयत्न केला असता तिने तेथेही शिवीगाळही केली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी या महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live