ऑनलाईन रेमडेसिविर मागवणाऱ्या महिलेची फसवणूक

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

मुंबई मध्ये ऑनलाईन रेमडेसिविर मागवणाऱ्या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. टिळक नगर मधील महिलेने १८ हजार रुपये देऊन रेमडेसिविर इंजेकशन ऑनलाईन मागवलं होते

मुंबई : राज्यात रेमडेसिविरचा Remedesivir  व ऑक्सिजन चा तुटवता सर्वत्र जाणवत आहे. त्यातच मुंबई मध्ये ऑनलाईन Online रेमडेसिविर मागवणाऱ्या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. Women in Mumbai Cheated who ordered Remdesivir online 

टिळक नगर Tilak Nagar मधील महिलेने १८ हजार रुपये देऊन रेमडेसिविर इंजेक्शन ऑनलाईन मागवलं होते. रेमडेसिविर इंजेकशनच्या नावाखाली त्या महिलेला साधी पावडर असलेल पॅकेट देण्यात आले. या सर्व प्रकरणी टिळक नगर पोलीस Police ठाण्यात तक्रार दाखल करून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. 

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सध्या रुग्णांचे नातेवाईक धावपळ करत आहे. जे काही प्रयत्न आहेत ते सर्व काही करून बघत आहेत. त्यापैकी ऑनलाईन चा एक प्रकार आहे आणि त्याच्या मध्ये सुद्धा आता फसवणूक झाल्याच दिसत आहे. १८ हजार रुपये त्या महिलेने खर्च केले आहे. मात्र हातामध्ये वेगळीच गोष्ट आली आहे. Women in Mumbai Cheated who ordered Remdesivir online 

या महिलेने व्हॉट्सअॅपवर Whatsaap आलेल्या एक मेसेज वर कॉल केला आणि ६ रेमडेसिविर मागवले. त्यासाठी त्यांना रुपेश गुप्ता नावाच्या व्यक्तीने १८ हजार रुपये त्यांच्याकडून गूगल- पे Google Pay द्वोरे मागवले. त्यानंतर अडीच तासांनी डिलेव्हरी बॉय रेमडेसिविरचे पार्सल घेऊन आला. त्यातमध्ये ५ बाटल्या होत्या. मात्र त्यामध्ये साधी पावडर भरलेली होती.

Edited By- Digambar Jadhav      


संबंधित बातम्या

Saam TV Live