धक्कादायक - गुंगीचे औषध देऊन महिला पोलिस अधिकाऱ्यावर अत्याचार 

Sedation
Sedation

मुंबई : फेसबुकवर Facebook झालेल्या मैत्रीतून आरोपीने महिला पोलिस Police अधिका-याला गुंगीचे औषध Sedative देऊन बलात्कार Rape केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. आरोपीने  अश्लील व्हिडीओ काढून धकावल्याची तक्रार या महिला अधिकाऱ्याने केली आहे. Women Police Officer Raped after giving sedatives in Mumbai

याप्रकरणी आरोपीसह त्याच्या दोन मित्राविरोधात पवई Powai पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पुढील तपासासाठी मेघवाडी पोलिस ठाण्यात वर्ग केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

हे देखिल पहा

मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला अधिका-याची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. ती मैत्री आणखी घट्ट झाली. त्यातून आरोपीने महिलेला चकाला येथे बोलावले होते. त्यावेळी शीतपेयातून महिलेला गुंगीचे औषध देऊन आरोपीने महिलेवर बलात्कार केला. 

तसेच तिचे अश्लील फोटो आणि  व्हिडिओही काढले. त्या व्हीडिओच्या सहाय्याने आरोपी महिला अधिका-याला धमकावत होता. ते व्हीडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन आरोपीने त्यांच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. Women Police Officer Raped after giving sedatives in Mumbai

ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने व्हिडिओ सोशल मिडियावर टाकून बदनामी न करण्यासाठी पैशाची मागणी केली, असा आरोप महिलेने केले आहेत. याप्रकरणी आरोपीच्या दोन मित्रांनी महिला पोलिस अधिका-याला धमकावले असून त्या दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व त्रासातून महिला अधिकारी बाहेर पडली असता आरोपीने महिलेच्या होणा-या पतीलाही फोन करून महिलेची बदनामी केली. Women Police Officer Raped after giving sedatives in Mumbai

या त्रासाला कंटाळून अखेर या महिला अधिका-याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पवई पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम 376(आय)(एन) 328,384, 120(ब), 504, 506, 509, 500 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 66(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी  मेघवाडी पोलिस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिस पुढील तपास करणार आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com