जिल्हा प्रशासनाचे काम भाजप कार्यकर्त्यांसारखेच- धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फेरी आणि सभेची आम्ही पोलिसांकडून रीतसर परवानगी घेतली. एका पक्षाला परवानगी दिल्यानंतर त्याच वेळी, त्याच दिवशी आणि त्याच मार्गावर दुसऱ्याला परवानगी देत येत नाही. तरीही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने भाजपला परवानगी दिली.
 जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिक्षक हे सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते झाल्यासारखे वागत आहेत, असा आरोप करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी (ता. 25) पत्रकार परिषदेत केला. 

पोलिस अधिक्षक आणि प्रशासन दबावात असल्याने निवडणूक निर्भयपणे पार पडेल की नाही अशी शंकाही उपस्थित करत या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले. माजी मंत्री  प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, संदिप क्षीरसागर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, सुभाष राऊत, दादासाहेब मुंडे उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले, लोकसभेचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी आम्ही रॅली आणि सभेची परवानगी मागितली ती दिली देखील अन नंतर ऐनवेळी सभेची परवानगी नाकारण्यात आल्याचे ते म्हणाले. भाजपच्या लोकांनी दबाव आणल्याने राष्ट्रवादीला मैदान उपलब्ध होऊ दिले नाही.

एका पक्षाला रॅलीसाठी परवानगी दिली असताना, दुसऱ्या पक्षाला परवानगी देणं हे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र तरीही दबावाखाली येऊन परवानगी देण्यात आली. निवडणुकींच्या काळात वारंवार अशी दडपशाही होऊ नये यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांसह, जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असे ते म्हणाले.

हत्येमागे भाजपा कार्यकर्ते -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड याची मध्यरात्री परळीत हत्या झाली. यात भाजप कार्यकर्त्यांचा हॅट असल्याचे समोर येत असल्याचा आरोप श्री. मुंडे यांनी केला. 

अर्ज भरायला ते रेल्वेने येणार! -
पुढच्या निवडणुकीत लोकसभेचा अर्ज भरायला रेल्वेने येणार अशी घोषणा पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केली होती. आज भाजपा उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे ते याच रेल्वेने येणार आहेत का असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. रेल्वेचे काम अपूर्ण आहे.
 
Web Title:The work of the district administration is similar to that of the BJP workers Dhananjay Mundanes allegation

संबंधित बातम्या

Saam TV Live