कामगारांनी लिहिलं स्वतःच्या रक्तानं 'पत्र'

blood
blood

सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील ११५ दिवसांपासून चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Chandrapur Government College) व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे डेरा आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या कोरोना योद्धा कामगारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले. मागील ११ महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील १२ महिन्यापासून नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही. 

कंत्राटदार नसताना कंत्राटी कामगारांकडून कोरोना आपत्तीमध्ये कामे करवून घेण्यात आली. मात्र कंत्राटदार नसल्यामुळे कामगारांचे पगार कोणाच्या मार्फत द्यायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे कामगारांचे ७ महिन्यांचे पगार थकीत आहेत. शासनाची पूर्वपरवानगी घेऊन ५६२ कंत्राटी पदांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या १२ महिन्यानंतर नवीन कंत्राटदाराला कामाचा आदेश देताना निविदेतील ३५५ कंत्राटी पदे कोणतेही ठोस कारण नसताना कमी करण्यात आली.(Workers write 'letter' with their own blood)

हे देखील पाहा

५६२ पदासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फक्त २०७ पदासाठी कंत्राटदाराला काम देण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कामगारांवर उपासमारी सोबतच बेरोजगारीची सुद्धा आपत्ती आलेली आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाने विशिष्ट कंत्राटदाराला लाभ पोहचविण्यासाठी भ्रष्टाचार केला. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कंत्राटादाराची नेमणूक करण्यास विलंब झाला, असा कामगारांचा आरोप आहे. ७ महिन्यांचा थकीत पगार, किमान वेतन व हक्काचा रोजगार या मागण्यांसाठी डेरा आंदोलनातील शेकडो कामगारांच्या रक्ताने पत्र लिहून व सह्या करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठविण्यात आले. कामगारांच्या जीवाची हानी झाल्यास वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री तसेच भ्रष्ट अधिकारी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे तसेच अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांनी या पत्रातून केलेली आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews     
           

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com