वर्ल्ड किडनी डे! किडनीची काळजी घ्या

साम टीव्ही
शुक्रवार, 13 मार्च 2020
  • मधुमेह, उच्च रक्तदाब, शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सूज येणे यासारख्या कारणांमुळे देखील किडनीवर परिणाम होतो.
  • एकदा तरी आरोग्य तपासणी करणे आवश्यक.

मुंबई: शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.
मात्र योग्य ती काळजी घेतली नाही तर किडनीचे विकार जडतात. किडनीचे विकार सर्व वयोगटात दिसून येतात. योग्य ती काळजी घेतली नाही तर विपरीत परिणाम होऊ शकतात. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते आणि दररोज जवळपास 180 लिटर इतके रक्त शुद्ध करते.

लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, लघवीतून पू येणे, पोटात सतत दुखणे किंवा चेहरा सुजणे ही  किडनीच्या आजाराची लक्षणे आहेत. 
मधुमेह, उच्च रक्तदाब, शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सूज येणे यासारख्या कारणांमुळे देखील किडनीवर परिणाम होतो. 

हे ही वाचा - प्रवासात गाडी लागते आणि उलटी होते? काय आहे कारणं आणि उपाय वाचा...

किडनीच्या आजारांवर उपचार उपलब्ध आहेत. दोन्ही मूत्रपिंडांचे काम करणे बंद झाल्यास म्हणजे किडनी निकामी झाल्यास डायलिसिस हा एकमेव पर्याय आहे. डायलिसिस म्हणजे किडनीचे काम मशिनने करणे. वर्षानुवर्षे डायलिसिसच्या साथीने आयुष्य जगणारे अनेक पेशंट आहेत. डायलिसिस अशक्य झालेल्या पेशंटना किडनी ट्रांसप्लान्टचा पर्याय आहे.

मात्र हे सगळे टाळायचे असेल तर वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे. त्या बरोबरच मीठाचे प्रमाण कमी केले तर उत्तम! 

 

Webtitle: World Kidney Day! How to take care of kidney?


संबंधित बातम्या

Saam TV Live