कोरोनावरील जगातील पहिली लस तयार, उंदरांवर यशस्वी चाचणी झाल्याचा इटलीचा दावा

साम टीव्ही
बुधवार, 6 मे 2020
  • कोरोनावरील जगातील पहिली लस तयार ?
  • कोरोनानं कंबरडं मोडलेल्या इटलीचा दावा
  • उंदरांवर यशस्वी चाचणी झाल्याचाही दावा

कोरोनावर लस शोधल्याचा दावा इटलीनं केलाय. उंदरावर लसीचे प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा इटलीनं केलाय. पाहुयात काय संशोधन झालंय.

कोरोनानं ज्या देशाचं कंबरडं मोडलंय, अशा इटलीनं कोरोनावर लस शोधल्याचा दावा केलाय. रोमच्या स्पॅल्लानझनी रुग्णालयात लसीच्या चाचण्या घेण्यात आल्यात. शास्त्रज्ञांनी उंदरांवर लसीचे प्रयोग केले. उंदरांच्या शरिरात लसीकरणानंतर अँटीबॉडीज तयार झाल्यात, तशाच मानवी शरिरातही तयार होतील, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. या लस टोचल्यानंतर उंदरांच्या शरिरात रोगप्रतिकारशक्तीही वाढल्याचा दावा करण्यात आलाय. 

इटलीमध्ये तयार करण्यात आलेली लसीची अतिशय प्रगत टप्प्यावर चाचणी सुरू असल्याची मिळतेय. नुकतीच इंग्लंडमध्येही कोरोना प्रतिबंधात्मक लसीची चाचणी झाली. इस्रायलनंही लस सापडल्याचा दावा केलाय. अनेक देशांमध्ये विविध औषधांचा वापर कोरोना प्रतिकारासाठी होतोय. पण ठामपणे अजूनही कोरोनावर लस मिळालेली नाही. आशा करुयात कोरोनावर रामबाण उपाय ठरेल, अशी लस लवकरात लवकर मिळेल.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live