चिंताजनक! कोरोनाच्या संसर्गानंतर ही 'या' आजाराच्या समस्यांना सामोरे जाव लागतय, पाहा कोणते आहेत आजार ?

corona heart strock
corona heart strock

राज्यभर कोरोनाने थैमान घातलं आहे, कोरोनामुळे अनेकांना मृत्युच्या सामोरे जाव लागलय, जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 12 कोटींवर गेली आहे, तर आतापर्यंत कोरोनामुळे 2 कोटी लोकांचा मृत्य ही झाला आहे. जगभरात कोरोनाची दूसरी तीसरी लाट येत आहे, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संशोधक लसीवर अजुनपर्यंत काम करत आहेत, अनेक ठिकाणी लसींच्या संशोधनावर यश आलंय, जगभरातील कोरोनाग्रस्त रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे , पण तरीही कोरोनामुळे सगळीकडे गंभीर वातावरण निर्माण झालयं अशातच कोरोनामुळे जास्तकाळ आजारी असणाऱ्या रूग्णांनी आजारावर मात करून देखील त्यांना काही शारीरीक समस्यांना सामोरे जावं लागतय.
 

कोरोना व्हायरसबाबत संशोधनातुन सतत नवीन माहीती समोर येत आहेत, मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की जे कोरोनामुळे जास्त काळ आजारी होते त्यांना छातीत दुखणे, स्ट्रोक येणे, रक्ताच्या गाठी तयार होणे असे आजार होऊ शकतात कोलंबीया विद्यापीठाच्या संशोधनातही असे समोर आलंय की कोरोनाबाधित असणाऱ्यांना फुप्फुसात गाठी तयार होऊ शकतात, तसेचं अन्य काही त्रास होण्याची शक्यता आहे. तरूण रूग्णांमध्ये कोरोनाच्या संसर्गानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढतात, तर काहींमध्ये हृदयाच्या ठोक्यांची गती थांबते, अचानक स्ट्रोक येतो, अंगदुखी होण्याचे त्रास अश्या आजारांची समस्या त्यांना होत आहेत त्यामुळे तज्ञांच्या सल्या नुसारच उपचार करून घेण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com