चिंताजनक! कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्ण्यांच्या संख्येत वाढ...

साम टीव्ही
बुधवार, 3 जून 2020
  • देशात असिम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या वाढली
  • एका रिसर्चद्वारे बाब झाली स्पष्ट
  • आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संसर्गाचा वेग काहीसा कमी होत असतानाच एक नवच संकट आरोग्य यंत्रणेसमोर उभं राहिलंय. लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने संसर्गाचा धोकाही वाढलाय.

भारतात कोरोनाच्या असिम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या वाढलीय. या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरीही त्याची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीएत. त्यामुळे असे रुग्ण कोरोनाचे छुपे वाहक होतात. आणि या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याची बाब एका अभ्यासाद्वारे समोर आलीय.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या या रिसर्च पेपरनुसार  

22 जानेवारी ते 30 एप्रिल या दरम्यान भारतात एकूण 40 हजार 184 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्यात त्यापैकी जवळपास 28 टक्के रुग्णांमध्ये पॉझिटिव्ह असतानाही कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नव्हती. तर ICMR च्या दाव्यानुसार भारतात केलेल्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी 69 टक्के रुग्णं असिम्प्टोमॅटिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढलीय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार जगभरातल्या 100 रुग्णांपैकी किमान 80 टक्के रुग्ण एकतर असिम्प्टोमॅटिक किंवा अगदीच अस्पष्ट लक्षणं असलेले आहेत. 

चिंताजनक बाब म्हणजे यापैकी 15 टक्के रुग्णं हे पुढे गंभीर, तर 5 टक्के रुग्ण अतिगंभीर स्वरुपात रुपांतरित होत असल्याची बाबही स्पष्ट झालीय. 

ही बाब लक्षात घेता आता आरोग्य यंत्रणेसमोर खरं आव्हान असेल, ते अशा असिम्प्टोमॅटिक रुग्णांना शोधून त्यांचापासून होणारा संसर्ग वेळीच रोखण्याचं.


संबंधित बातम्या

Saam TV Live