चिंताजन बातमी! देशात दारुड्यांची संख्या वाढली,अल्पवयीन मुलंही दारुच्या आहारी

साम टीव्ही
सोमवार, 15 मार्च 2021

देशात दारुड्यांची संख्या वाढली
18 वर्षांखाली 75 टक्के मुलांनी दारुची चव घेतली
2020मध्ये भारतीयांनी रिचवली 653 कोटी लिटर दारु

 

 

देशातल्या तरुणाईत दारु पिण्याचं प्रमाण वाढलंय, ही परिस्थिती चिंताजनक आहे. शहरांमधल्या तब्बल ७५ टक्के मुलांनी दारुची चव चाखल्याची माहिती समोर आलीय.

भारतीय समाजात दारु पिण्याला प्रतिष्ठा नव्हती. पण येत्या काळात दारु पिण्याला सोशल स्टेटस मिळेल की काय अशी स्थिती निर्माण झालीय.  भारतात 2020मध्ये  तब्बल 653 कोटी लिटर दारु रिचवली गेली. दारू पिणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागलाय. धक्कादायक बाब म्हणजे शहरांतील 18 वर्षांखालील 75 टक्के मुलांनी कधीतरी दारुची चव चाखलीय.  दारु पिण्यामुळं देशाची भावी पिढीचं अस्तित्व धोक्यात आल्याची भीती सामाजिक क्षेत्रातून व्यक्त केलीय.

 सरकार मात्र 18 वर्षांखालील मुलांना कुठंही दारु देऊ नये असा कायदा केल्याचं सांगून आपली पाठ थोपटून घेतंय. 

 सरकारला तरुणाई दारुच्या आहारी चाललीय याची चिंता दिसत नाही. सरकारचं फक्त दारुविक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर लक्ष आहे असं खेदानं म्हणावं लागेल.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live