हिंगणगाव खुर्द येथे २ लाख ५७ हजारांचा गांजा जप्त

विजय पाटील
रविवार, 18 एप्रिल 2021

सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द येथील संभाजी सदाशिव जाधव याच्या शेतामध्ये २ लाख ५७ हजार ८० रुपये किंमतीचा अवैध गांजा सापडून आला आहे. एकूण तब्बल २५ किलो ७०८ग्रॅम वजनाचा हा गांजा होता

सांगली: सांगलीच्या Sangali कडेगाव Kadegaon तालुक्यातील हिंगणगाव Hingangaon खुर्द येथील संभाजी सदाशिव जाधव याच्या शेतामध्ये २ लाख ५७  हजार ८० रुपये किंमतीचा अवैध गांजा सापडून आला आहे. एकूण तब्बल २५ किलो ७०८ ग्रॅम वजनाचा हा गांजा होता. याप्रकरणी संशयित संभाजी जाधव याच्या विरोधात कडेगाव पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी संभाजी जाधव यास पोलिसांमार्फत अटक  करण्यात आली आहे.  Worth Two lakh Fifty seven thousand cannabis seized at Hingangaon Khurd 

गणगाव खुर्द येथे संशयित संभाजी जाधव या व्यक्तीची स्वतःच्या मालकीच्या जमिन आहे. शेतात वांग्याच्या रोपाच्या कडेला केळीलगत ठिकठिकाणी बेकायदा, विनापरवाना, मानवी मनावर आणि मेंदुवर परिणाम करणारे गुंगीकारक घटक असलेल्या गांजाच्या cannabis रोपाची लागवड केलेली  होती. या बेकायदेशीर लागवडीची माहिती कडेगाव पोलिसांना मिळाली होती.

फडणवीसांच्या तोंडात कोरोना कोंबला असता - शिवसेना आमदाराचे वक्तव्य

मिळालेल्या माहितीप्रमाणे कडेगाव पोलिसांनी हिंगणगाव खुर्द येथे जाऊन संभाजी जाधव याच्या शेतात छापा टाकला. तेथे गेले असता तिथे ५ ते ६ फुट उंचीची गांजाची झाड दुमडून प्लास्टिकच्या तीन पोत्यामध्ये ठेवलेली पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामध्ये एकुण २५ किलो ७०८  ग्रॅम वजनाची गांजाची झाडे असा एकुण २ लाख ५७ हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडून आला. सदर गांजा पोलीस पथकाने जप्त करुन संशयित संभाजी जाधव याला अटक केली आहे. Worth Two lakh Fifty seven thousand cannabis seized at Hingangaon Khurd 

याप्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी संशयित जाधव याच्या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद Complaint दिली आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे हे करीत आहेत.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live