अरेच्चा ....! चिंचोक्यांना सोन्याचा भाव चिंचोके 1900 रुपये क्विंटल...

साम टीव्ही
शनिवार, 20 मार्च 2021

ज्वारीपेक्षा चिंचोका खातोय भाव
चिंचोके 1900 रुपये क्विंटल
चिंचोक्यांची बाजारपेठ वाढली

 

 

 

 

चिंचोका म्हटलं तर शून्य किंमत. पण आता तसं राहिलेलं नाही. चिंचोक्याचा भाव वधारलाय. चिंचोक्याला तब्बल २ हजार क्विंटलचा भाव मिळतोय.

आरारा खतरनाक! या सलूमध्ये आग, सत्तूर आणि हतोड्यानं केली जाते हजामत

चिंचोक्यांना आपल्याकडं शून्याची किंमत आहे. पण आता काळ बदललाय. चिंचोक्यालाही किंमत आलीय. सोलापूरच्या बार्शी बाजारसमितीत चिंचोक्यांना तब्बल 1900 रुपये क्विंटलचा भाव मिळालाय. सध्या बार्शीच्या बाजारपेठेत रोज 5 हजार क्विंटल चिंचोक्याची आवक होते. चिंचोक्यांची आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक आणि मराठवाड्यातून आवक होते. आईसक्रिम, सूप, सॉफ्ट ड्रिंकमध्ये चिंचोक्याचा वापर होतो. भारतातून दरवर्षी 400 कोटींची चिंचोक्यांची पावडर निर्यात होते.  सध्या ज्वारीपेक्षाही चिंचोक्याचे भाव अधिक स्थिर आहेत.

 चिचोका प्रक्रिया उद्योगावर जवळपास 12 फार्मा सेक्टर आणि पेपर इंडस्ट्रीत चिंचोक्याचा वापर वाढल्यास आगामी काळात चिंचोक्यांना सोन्याचा भाव येणार असल्याचा दावा करण्यात येतोय.
 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live