सचिन तेंडुलकर - रवी शास्त्री
सचिन तेंडुलकर - रवी शास्त्रीTwitter @RaviShastriOfc

WTC Finals: सचिनने रवी शास्त्रींचे केले जोरदार कौतुक

डब्ल्यूटीसीच्या अंतिम (WTC Finals) सामन्यामध्ये भारत शुक्रवारपासून न्यूझीलंडशी (ENG vs IND) सामना खेळणार आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) प्रशिक्षक रवी शास्त्रींचे (Ravi Shastri) कौतुक केले

नवी दिल्ली: डब्ल्यूटीसीच्या अंतिम (WTC Finals) सामन्यामध्ये भारत शुक्रवारपासून न्यूझीलंडशी (ENG vs IND) सामना खेळणार आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) प्रशिक्षक रवी शास्त्रींचे (Ravi Shastri) कौतुक केले आणि म्हणला या कठीण काळात शास्त्री खेळाडूंना योग्य मूडमध्ये ठेवत आहेत. शास्त्री सन २०१७ पासून भारताचे प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम विराट (Virat Kohli) यापूर्वी दोन मोठ्या कसोटी मालिका जिंकूण डब्ल्यूटीसीच्यात अंतिम सामन्यामध्ये पोहोचला आहे. सचिनने शास्त्रींची तुलना माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांच्या सोबत केली आहे. (WTC Finals Tendulkar praises Ravi Shastri)

सचिनने एका खासगी वाहिनीशी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांची भूमिका म्हणजे खेळाडूंना कठीण काळात सकारात्मक ठेवने असते. सचिन म्हणाला की या स्तरावर प्रत्येक फलंदाज शाॅट कसे खेळावे हे जाणतो. पण खेळाडूंना योग्य मनस्थितीत ठेवणे हे प्रशिक्षकाचे काम आहे. ड्रेसिंग रूममध्ये कठीण काळात वातावरण चांगले राहणे खेळाडूसाठी उर्जा देते.

माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी न्यूझीलंडविरुद्दचा कसोटी सामना अनिर्णित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका कशी बजावली होती याचे उदाहरणे सचिनने यावेळी बोलताना दिले. सचिन म्हणाला की आम्ही नेपियरमध्ये एक कसोटी सामना खेळत होतो आणि पहिल्या डावात न्यूझीलंडने भक्कम धावसंख्या उभारली होती. आम्हीही खूप चांगल्या धावा केल्या पण त्यांची धावसंख्या खूप मोठी होती. आणि दोन दिवस बाकी असताना आम्हाला फॉलो-ऑन दिला आणि खेळायला भाग पाडले.

सचिन तेंडुलकर - रवी शास्त्री
शिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिम्मत नाही - संजय राऊत

त्यानंतर सचिनने सांगितले की गॅरी अजिबात नाराज झाले नाही. ते ड्रेसिंग रूममध्ये आले आणि म्हणाले की आपण काय आहोत हे दाखवण्याची वेळ आली आहे. जाऊन दोन दिवस फलंदाजी करा. आम्ही दोन दिवस फलंदाजी केली आणि सामना बरोबरीत सुटला. सचिन म्हणाला की अशा परिस्थितीत प्रशिक्षक शांत राहिल्यास बर्‍याच समस्या संपतात आणि अशीच काही कामे रवी शास्त्री यांनी केली आहेत. सचिन म्हणाला की जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही खेळाडूंशी कडक वागले पाहिजे, पण अशा क्षणी तुम्ही खेळाडूंशी कसे बोलता तेही खूप महत्वाचे आहे. आणि हे काम शास्त्रींनी खूप चांगले केले आहे.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com