पोलिसांना गुंगारा देऊन बालविवाह, अखेर पोलिसात गुन्हा दाखल 

प्रसाद नायगावकर
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

जिल्हा बालसंरक्षण कक्षाने चारच दिवसापूर्वी नेर तालुक्यातील मुकिंदपूर येथे एक बालविवाह रोखला होता. यावेळी बालवधूच्या आई वडिलांचे समुपदेशन करण्यात आले होते. यानंतर आई वडिलांकडून मुलीचे जोपर्यंत वय १८ होत नाही तोपर्यंत लग्न न लावण्याचे हमीपत्रंही घेण्यात आले होते

यवतमाळ :  जिल्हा बालसंरक्षण कक्षाने चारच दिवसापूर्वी नेर तालुक्यातील मुकिंदपूर येथे एक बालविवाह रोखला होता. यावेळी बालवधूच्या आई वडिलांचे समुपदेशन करण्यात आले होते. यानंतर आई वडिलांकडून मुलीचे जोपर्यंत वय १८ होत नाही तोपर्यंत लग्न न लावण्याचे हमीपत्रंही घेण्यात आले होते. पण कायद्याला न जुमानता याच बालवधुचा  पोलिसांना आणि बालसंरक्षण कक्षाला गुंगारा देऊन गनिमी पद्धतीने घाटंजी तालुक्यात विवाह सोहळा आयोजित केला होता. Yavatmal Tehsildar Averted Child Marriage

पण या विवाहाची Marriage गुप्त माहिती घाटंजीचे चे तहसीलदार पूजा हरणे यांना मिळाली. तहसीलदार घाटंजी यांनी तातडीने पावले उचलीत  जिल्हा बालसंरक्षण कक्ष आणि पोलिसांसोबत विवाहस्थळाला भेट दिली.

यावेळी नेमकेच मंगलाष्टके सुरु होती. मात्र वेळीच प्रशासन धडकल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. गोंधळाचा फायदा घेऊन बालवधूसह तिच्या आई वडिलांनी विवाहस्थळावरून पोबारा केला. Yavatmal Tehsildar Averted Child Marriage

या घटनेत बालविवाह कायद्यानुसार संबंधीतावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०२१ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात आज मितिस्तोवर जिल्हा बालसंरक्षण कक्ष अधिकारी देवेंद्र राजुरकर यांनी महसूल विभाग आणि पोलिसांच्या Police मदतिने १३ बालविवाह थांबविले आहेत . आजच्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही बालविवाह होत असतील तर यापेक्षाही कोणते दुर्दैव.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live