Budget 2019 : यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक : पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : देशातील 6 कोटी परिवाराला 'उज्ज्वल योजनें'तर्गत लाभ मिळाला आहे. आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात 'आयुष्यमान भारत' योजना आणण्यात आली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच देशातील 130 कोटी जनतेला ऊर्जा देणारा असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.

2019-20 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पानंतर पंतप्रधान मोदींनी यावर भाष्य केले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे :  

- देशातील 6 कोटी कुटुंबियांना उज्ज्वल योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे.

- 'गरीबी रेकॉर्ड' आता झपाट्याने कमी होत आहे. 

- पेन्शन योजनेचा लाभ सर्व कामगारांना होणार आहे

- प्राप्तिकरात मिळालेल्या सवलतीमुळे देशातील अनेक करदात्यांना फायदा होईल.

- या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या.

- 'पीएम किसान' योजनेचा लाभ 12 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. 

- यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना आणणारा आहे.

- ग्रामीण, कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रातील जनतेला याचा फायदा होणार आहे

- गरीबांना आपली स्वप्नं साकारण्यात फायदा होणार आहे.

- पेन्शन योजना 60 वर्षांवरील नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरेल. 

- देशातील घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

- वंचित घटकासाठीही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

- यंदाचा अर्थसंकल्प 130 कोटी जनतेला ऊर्जा देणारा, सर्वसमावेशक असा आहे.

Web Title: This year budget is comprehensive says Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live