पिवळ्या बुरशीचा रुग्ण; कुणी यावर प्रकाश टाकेल काय?

yellow fungus.jpg
yellow fungus.jpg

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरस नंतर देशात काळी बुरशी Black Fungus आणि पांढऱ्या बुरशी White Fungus चे अनेक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात या दोन्ही बुरशीचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यानंतर अलीकडे दोन दिवसांपूर्वीच पिवळी बुरशी Yellow fungus चा पहिला रुग्ण देशात आढळून आला. किंबहुना पिवळ्या बुरशीचा हा जगातील पहिलाच रुग्ण असून तो भारतात आढळून आला आहे. (Yellow fungus patient; Can anyone shed light on this?) 

तथापि, पिवळ्या बुरशीचा प्रकार समोर आल्यानंतर अनेक डॉक्टरांमध्ये याबाब चर्चा सुरू आहे. बुरशीचे अनेक प्रकार असतात त्यात आता पिवळ्या बुरशीचा रुग्ण आढळून आला आहे, असा अंदाज काही डॉक्टर्स वर्तवत आहेत. मात्र काही तज्ञांनी हा अंदाज फेटाळून लावला आहे. मात्र अद्याप कोणताही डॉक्टर पिवळ्या बुरशीबद्दल अधिकृतपणे काहीही बोलायला तयार नाही.

दरम्यान दिल्लीतील गाझियाबादमध्ये एका खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाला काळी, पांढरी आणि त्यासोबतच आणखी एका बुरशीची लागण झाल्याचे आढळून आले. संजय नगर येथे राहणाऱ्या या रुग्णाचे नाव कुंवरसिंग असे आहे. कुंवरवर उपचार करणारे डॉ. बी.पी. त्यागी यांनी त्यास यलो फंगस असे नाव दिले. त्यानंतर सर्व डॉक्टर आपापसांत फोनवर दीर्घ चर्चा करत असून बरेच डॉक्टर्स पिवळ्या बुरशीच्या संसर्गावर विश्वास ठेवत नसल्याचे, एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

तथापि, जर कुवरसिंग मध्ये आढळून आलेल्या बुरशीची पुष्टी करण्यासाठी आवश्यक सर्व तपासणी केली गेली असेल आणि त्यानंतर त्याला पिवळी बुरशी असे वर्णन केले असेल तर त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण डॉक्टरांनी त्यांचे मत देण्यापूर्वी अहवाल तपासणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे, डॉ बीपी त्यागी यांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूची लागण देखील एका जीवातून झाली. पाली आणि सारड्यांमध्ये पिवळ्या बुरशीचे संक्रमण होते. त्यामुळे  यलो फंगसची प्रकरणे वाढू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

आयएमए अध्यक्ष काय म्हणाले?

अद्याप मी या रुग्णाचे अहवाल पाहिलेले नाहीत. तसेच या बुरशीचे काहीही वाचलेले नाही. त्यामुळे याक्षणी तरी मी स्पष्टपणे काही सांगू शकत नाही. - डॉ. आशिष अग्रवाल, अध्यक्ष, आयएमए.

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com