येरमाळा येडेश्वरीची चैत्र यात्रा यंदा सुद्धा रद्द

विश्वभूषण लिमये
सोमवार, 26 एप्रिल 2021

लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या येथील येडेश्वरी देवीची यात्रा यंदा  २८ एप्रिल ते २ मेच्या दरम्यान होणार होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सलग दुसऱ्यावर्षी येडेश्वरी आईची यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आला आहे. 

उस्मानाबाद-  महाराष्ट्राची Maharshtra कुलुस्वामीनी आई तुळजाभवानीची Tuljabhavani धाकटी बहीण येरमाळ्याची येडेश्वरी yedeshwari मातेची चैत्री यात्रा Yatra कोरोनाच्या Corona पार्श्वभूमिवर  यंदा सुद्धा रद्द करण्यात आली आहे .लाखो भाविकांचे आराध्यदैवत असलेल्या येथील येडेश्वरी देवीची यात्रा यंदा  २८ एप्रिल ते २ मेच्या दरम्यान होणार होती.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सलग दुसऱ्यावर्षी येडेश्वरी आईची यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर mandir समितीकडून घेण्यात आला आहे. Yermala Yedeshwari's Chaitra Yatra canceled this year 

सध्या कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशात थैमान घातले असून, यामुळे या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बहुसंख्येने लोक जमतील असे धार्मिक कार्यक्रम, विधी, यात्रा महोत्सव प्रशासनाने बंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. यात येणाऱ्या एप्रिल महिन्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा म्हणून गणली जाणारी येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची  २८ एप्रिल ते २ मेच्या दरम्यान होणार यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा  ठराविक पुजारी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा होणार आहे. 

यात्रेनिमित्त दरवर्षी राज्यभरातून सुमारे आठ ते नऊ लाख भाविक यात्रेच्या मुख्य चुन वेचण्याचा कार्यक्रमासाठी दाखल होत असतात. पाच दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी परिसरातील तसेच राज्याच्या विविध भागांतून, परराज्यातून असंख्य व्यावसायिक यात्रा काळात व्यवसायासाठी दाखल होत असतात. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल यात्रा काळात होत असते. या यात्रेसाठी माल खरेदीची तयारी व्यावसायिक महिनाभरपासूनच करत असतात. मात्र सध्या राज्यातील यात्रा कोरोना व्हायरसमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व भाविकांना देवीच्या यात्रेला मुकावं लागणार आहे त्यामुळे देवी भक्तांमध्ये नाराजीच चित्र दिसून येत आहे. Yermala Yedeshwari's Chaitra Yatra canceled this year 

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live