'नीरव मोदी, विजय मल्ल्या पळाला, आम्ही लाईनमध्ये उभे राहून हक्काच्या पैशांसाठी लढतोय'

सिद्धेश सावंत
शनिवार, 7 मार्च 2020

 देशभरात सगळीकडे येस बॅंकेच्या आर्थिक संकटाची चर्चा सुरू असतानाच बॅंकेचे संस्थापक व माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी बॅंकेत चालू असलेल्या कोणत्याही घडामोडीबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे म्हटले आहे. 

मुंबई - 'नीरव मोदी, विजय मल्ल्या पळाला, आम्ही लाईनमध्ये उभे राहून हक्काच्या पैशांसाठी लढतोय', असा उद्विग्न सवाल येस बँकेच्या खातेधारकांनी विचारला आहे. बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी खातेधारकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. त्यामुळे नाहक मनस्तापाला सामोरं जाव लागत असल्यानं खातेधारक नाराज झालेत. 

माध्यमांशी बोलताना अहमदाबाद, मुंबई आणि दिल्लीतील ग्राहकांनी आपला संताप व्यक्त केलाय.  गेल्या काही वर्षांत अनेक बँकांवर निर्बंध घातल्याच्या घटना घडल्यायत. त्यातच देशातील मोठ्या चार खासगी बँकांमधली एक असलेली यस बँक अवसायनात गेल्याने खातेदारांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. बँकांची आर्थिक स्थिती बिघडल्यावर निर्बंध घातले जात आहेत. पण बँकांची परिस्थिती बिघडू नये म्हणून योग्य ती काळजी सरकारी पातळीवर आधीपासून का घेतली जात नाही? असा प्रश्न आता रडकुंडीला आलेले खातेदार विचारत आहेत.

 

हेही वाचा - YES बँकेच्या संस्थापकांच्या अडचणी वाढणार, ईडी मारला छापा

हेही वाचा - सही रे सही ! बोगस सही करत लुटले तब्बल इतके लाख

 

आर्थिक स्थिती खालावत असल्याने यस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेत. या निर्बंधांमुळे यस बँकेच्या खातेदारांना महिन्याकाठी अवघे 50 हजार काढता येणारेत. थकित कर्जांची वसुली न झाल्याने आणि भांडवल उभं करण्यात बँकेला अपयश आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कठोर पावलं उचललीयत. त्यामुले सकाळपासूनच यस बँकेच्या शाखांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्यायत. 

 

पाहा खातेधारकांचे संतप्त सवाल - 

 

हेही पाहा - YES BANK | येस बँकेचं 'महाभारत'

YES BANK | येस बँकेचं 'महाभारत'

 

 

yes bank people angry neerav modi vijay mallya ran away reaction nirav modi vijay mallya india finance


संबंधित बातम्या

Saam TV Live